दिग्दर्शक प्रकाश झा यांचा सामाजिक नाट्यावर आधारित ‘सत्याग्रह’ चित्रपट बॉक्स ऑफीसवर ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात बॉलीवूड शेहनशाह अमिताभ बच्च्न, अजय देवगण आणि करिना कपूर हे मुख्य भूमिकेत असून अर्जून रामपाल, मनोज वाजपेयी, अमृता राव यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती यूटीव्ही मोशन आणि झा यांच्या संयुक्त उद्यमाने करण्यात आलेली आहे.
ऑगस्टमध्ये तीन मोठ्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात शाहरुख खानचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ (८ ऑगस्ट), मिलन लुथिरीयाचा ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई दोबारा’ (१५ ऑगस्ट) आणि प्रकाश झांचा ‘सत्याग्रह’ (३० ऑगस्ट) यांचा समावेश आहे.

Story img Loader