विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट सध्या बराच गाजतोय. सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. १९९० साली काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि त्यांच्या पलायनावर आधारित असलेल्या या चित्रपटाचं एकीकडे कौतुक होताना दिसतंय तर एक वर्ग असाही आहे जो हा चित्रपट एका विशिष्ट प्रकारचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आल्याचं म्हणत या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहे. नुकतीच दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी या चित्रपटाला विरोध करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द कश्मीर फाइल्स’बाबक अभिनेता प्रकाश राज यांनी केलेले ट्वीट्स सध्या चर्चेत आहेत. त्यांनी एकमागोमाग एक काही ट्वीट केले आहेत. ज्यात एक व्हिडीओचाही समावेश आहे. जो चित्रपट संपल्यानंतर थिएटरमधील परिस्थिती दाखवत आहे. ज्यात बरेच लोक मोठ्या आवेशात मुस्लीम लोकांच्या विरोधात टीका करताना दिसत आहेत आणि अखेर ‘जय श्री राम’च्या घोषणा देत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना प्रकाश राज यांनी लिहिलं, ‘कश्मीर फाइल्स हे घाव भरून काढण्याचं काम आहे? की या चित्रपटातून लोकांमध्ये फक्त तिरस्काराचं बीज लोकांमध्ये रोवलं जातंय? की आणखी घाव दिले जात आहेत?. मी फक्त विचारत आहे.’

आणखी वाचा- The Kashimr Files साठी अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्रींनी किती घेतलं मानधन? वाचा सविस्तर

अशाच आशयाची आणखी काही ट्वीट प्रकाश राज यांनी केली आहेत. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये त्यांनी दिल्लीतील दंगे, गोध्रा केस आणि नोटबंदी अशा प्रकारच्या फाइल्सवरही चित्रपट येतील का? असा प्रश्न विचारला आहे. प्रकाश राज यांच्या मते, देशातील हिंदू आणि मुस्लीम समुदायामध्ये या चित्रपटातून फूट पाडली जात आहे.

आणखी वाचा- ‘द कश्मीर फाइल्स’च्या कमाईची रक्कम दान का करत नाहीस? IAS अधिकाऱ्याच्या प्रश्नाला विवेक अग्निहोत्रींचं उत्तर

दरम्यान आपल्या या ट्वीट्समुळे प्रकाश राज यांना सोशल मीडियावर ट्रोलही व्हावं लागलंय. अनेक युजर्सनी त्यांच्या या ट्वीटवर कमेंट करताना टीका केली आहे. तर कश्मीर फाइल्स बद्दल बोलायचं झाल्यास ११ मार्चला प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणार असल्याचंही बोललं जातंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash raj angry reaction on vivek agnihotri film the kashmir files mrj