अभिनेते प्रकाश राज त्यांच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते राजकारणाबद्दलही त्यांची मतं मांडत असतात, अनेकदा ते पंतप्रधान मोदींवर टीका करत असतात. प्रकाश राज यांनी नुकतंच एक ट्वीट केलंय, यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना हिटलरशी केली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींचा एक फोटो शेअर केला आहे.
“राज्यात लव्ह-जिहादच्या घटना…”; केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं ‘द केरला स्टोरी’बद्दल वक्तव्य
प्रकाश राज यांनी एक फोटो शेअर केला आहे. पहिला फोटो हिटलरचा आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी आहेत. मोदींच्या फोटोमध्ये त्यांच्यासमोर मुलं दिसत आहेत. त्यात त्यांच्या आणि मुलांमध्ये काटेरी तार आहे. तर, हिटलरच्या फोटोमध्ये या बाजुला तो, त्याच्यासमोर मुलं आणि मधे काटेरी तार दिसत आहे. दोन्ही फोटोंची फ्रेम सारखीच आहे. हा फोटो कोलाज केलेला आहे. हा फोटो शेअर करत प्रकाश राज यांनी मोदींवर टीका केली आहे. “इतिहासाची पुनरावृत्ती होते… भविष्य या काटेरी तारांमागे आहे, सावध राहा…” असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.
प्रकाश राज यांच्या ट्विटनंतर अनेक जण त्यांच्यावर टीका करत आहे. देशाच्या पंतप्रधानांची तुलना हिटलरशी केल्याने युजर्स चांगलेच संतापले आहेत. तर काही जण मात्र त्यांचं समर्थन करतानाही दिसत आहेत. दरम्यान, प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींची हिटलरशी तुलना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही प्रकाश राज यांनी त्यांची तुलना हिटलरशी केली आहे. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिटलरचा वृत्तपत्र वाचतानाचा फोटो शेअर केला होता. त्यावेळी त्यांनी मोदींना हिटलरचा पुनर्रअवतार म्हटलं होतं.