बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते प्रकाश राज गेले काही दिवस सातत्याने चर्चेत आहेत. ते चर्चेत येण्याचे कारण त्याचे चित्रपट नसून त्यांचे ट्वीट आहेत. चांद्रयान ३ बद्दल आर्मस्ट्राँग टाइम्समधील एका प्रसिद्ध विनोदाबद्दल ट्वीट केल्यानंतर त्यांना ट्रोल केलं गेलं होतं. आता ते त्यांच्या नव्या ट्वीटमुळे चर्चेत आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्न ठरलं, पत्रिका छापल्या अन् अचानक ‘अंगूरी भाभी’ने मोडलेलं लग्न; शिल्पा आजही अविवाहीत, पण ‘त्या’ अभिनेत्याने…

चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा असं वक्तव्य करणाऱ्या स्वामी चक्रपाणी यांच्या विधानाची प्रकाश राज यांनी खिल्ली उडवली आहे. स्वामी चक्रपाणी यांनी म्हटलंय की मला पंतप्रधान मोदींचे खूप खूप आभार मानायचे आहेत की त्यांनी चांद्रयान-३ च्या लँडिंग ठिकाणाचे नाव शिवशक्ती पॉइंट असे ठेवले आहे. आता इतर कोणत्याही विचारसरणीचे लोक आणि देश तिथे जाऊन कट्टरपंथी विचारधारा पसरवण्याआधी, दहशतवाद पसरवण्याआधी चंद्राला हिंदू सनातन राष्ट्र घोषित करून त्याची राजधानी ‘शिवशक्ती पॉइंट’ बनवावी, अशी मागणी स्वामी चक्रपाणी यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्रकाश राज यांनी ट्वीट केलंय.

“चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, आणि…”, चांद्रयान ३ च्या यशानंतर हिंदू महासभेच्या चक्रपाणी महाराजांची मागणी

एक पोस्ट शेअर करत प्रकाश राज यांनी लिहिलं, “ओके… तुमचा प्रवास शुभ होवो.” यासोबतच त्यांनी त्यांचा प्रसिद्ध हॅशटॅग जस्ट आस्किंग देखील लिहिला आणि पुढे लिहिलं, “चांद्रयानच्या लँडिंगनंतर साधूंना चंद्राला ‘हिंदू राष्ट्र’ घोषित करायचे आहे.” त्यांचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले आहे.

प्रकाश राज यांचे ट्वीट

प्रकाश राज यांच्या ट्विटवर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिलं, “आता पंतप्रधानांना लवकरच चंद्रावर जाऊन उद्घाटन करावे लागेल.” तर काहींनी “आता चंद्रावरच स्थायिक व्हा,” असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash raj mocks at chakrapani maharaj after he demands pm modi to declare moon hindu rashtra hrc