प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी एका अलीकडील मुलाखतीत आपल्या जीवनातील अत्यंत कठीण प्रसंगाचा अनुभव सांगितला. २००४ मध्ये त्यांच्या पाच वर्षांच्या मुलगा सिद्धूचं दुर्दैवी निधन झालं. त्यावेळी ते ललिता कुमारी यांच्याशी विवाहित होते. मुलाच्या निधनाने त्यांना मोठा धक्का बसला, अंत्यसंस्काराच्या वेळीचा प्रसंग त्यांचासाठी खूपच कठीण होता. या घटनेमुळे त्यांच्या जीवनाबद्दलच्या दृष्टिकोनात खोलवर बदल झाला.

एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात, प्रकाश राज यांनी मुलगा सिद्धूच्या निधनाच्या वेदनेबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “दुःख हे प्रत्येकासाठी एक वैयक्तिक भावना असते, परंतु त्यात पूर्णपणे गढून न जाता, जीवनात पुढे जाणं गरजेचं आहे.” कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी मृत्यूच्या अटळ सत्याला स्वीकारून, जीवन साजरं करण्याचं महत्त्व समजून घेतलं.

हेही वाचा…“गौरी चांगली आई होईल अजिबात वाटलं नव्हतं”, शाहरुख खानचे पत्नीबद्दलचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

प्रकाश राज यांनी पुढे सांगितलं की, ते आपल्या दुःखावर विचार करण्याऐवजी आनंदावर लक्ष केंद्रित करतात. ते म्हणाले, “दुःख वाटण्यापेक्षा आनंद वाटणं मला अधिक जवळचं वाटतं.” आनंद वाटल्यानं वैयक्तिक वेदनेला सावरण्यात मदत होते, असं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, “काही दुःखं इतकी खोलवर असतात की त्यांना घेऊनच जगायला शिकावं लागतं.”

प्रकाश राज यांचं पहिलं लग्न ललिता कुमारी यांच्याशी झालं होतं आणि त्यांना मेघना, पूजा, आणि सिद्धू अशी तीन मुलं होती. २००४ मध्ये सिद्धूच्या निधनासारख्या मोठ्या दुःखामुळे त्यांचं वैवाहिक जीवन प्रभावित झालं, आणि २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर, २०१० मध्ये प्रकाश राज यांनी कोरिओग्राफर पोनी वर्मा हिच्याशी विवाह केला, आणि २०१५ मध्ये त्यांना वेदांत नावाचा मुलगा झाला.

हेही वाचा…मद्यधुंद अवस्थेत जावेद अख्तर यांनी शबाना आझमींशी केलेलं लग्न, ज्येष्ठ अभिनेत्याचा दावा; म्हणाले, “त्या रात्री…”

प्रकाश राज यांच्या जीवनातील या दु:खद प्रसंगाने त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, आणि त्यांनी कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी आनंदाच्या गोष्टी शोधत जगण्याचं एक नवं ध्येय स्वीकारलं.