दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. अलिकडेच एका मुलाखतीत साई पल्लवीनं काश्मिरमध्ये होणाऱ्या टार्गेट किलिंगवर कमेंट केली होती. तिनं काश्मिरमध्ये होणाऱ्या हिंसाचाराची तुलना मॉब लिंचिंगशी केली होती. यानंतर साई पल्लवीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून बरीच टीका करण्यात आली होती. पण आता साई पल्लवीच्या या वक्तव्याचं प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी समर्थन केलं आहे. प्रकाश राज यांनी साई पल्लवीच्या वक्तव्यावर स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

साई पल्लवीनं एका पोस्टमध्ये आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तिने लिहिलं, “त्या मुलाखतीत मला तू उजव्या विचारसारणीच्या बाजूने आहेस की डाव्या विचारसारणीच्या असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर मी कोणाच्याही बाजूने नाही असं उत्तर दिलं होतं. मला फक्त एक चांगली व्यक्ती म्हणून जगायचं आहे. आपली ओळख आज विचारांच्या आधारावर होत आहे जे चुकीचं आहे. ज्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यांचा बचाव करणं चुकीचं आहे. मी ‘कश्मीर फाइल्स’ पाहिला होता. पण मी असा नरसंहार कधी पाहिलेला नाही त्यामुळे त्याचा माझ्यावर परिणाम झाला. पण मला हे माहीत नव्हतं की आजही तिथे लोकांना या गोष्टींना सामोरं जावं लागतंय.”

Manikrao Kokate On DCM Ajit Pawar
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रि‍पदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे

आणखी वाचा- “कळू दे ना सगळ्यांना हा चिकना माल या कंपनीचा आहे…”, संतोष जुवेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

साई पल्लवीनं पुढे लिहिलं, “मी या नरसंहाराची तुलना मॉब लिंचिंगशी केली नाही. तर मला हे सर्व पाहून मी लॉकडाऊनमध्ये ज्या घटना पाहिल्या त्या आठवल्या. कोणत्याही प्रकारची हिंसा ही नेहमीच चुकीची आहे आणि आपल्या धर्मात तर हे पापच आहे.” साई पल्लवीच्या या पोस्टवर प्रकाश राज कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. प्रकाश राज यांनी ट्विटरवर साई पल्लवीची पोस्ट शेअर करताना लिहिलं, ‘माणुसकी सर्वात आधी असायला हवी. साई पल्लवी माझा तुला पाठिंबा आहे.’

दरम्यान एका मुलाखतीत साई पल्लवीने, “द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत.” असं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला होता.

Story img Loader