अभिनेते प्रकाश राज यांनी तीन दिवसांपूर्वी एक ट्वीट केलं होतं, ज्यावरून चांगलाच गदारोळ झाला होता. त्यांनी चांद्रयान ३ ची खिल्ली उडवली असल्याचं म्हणत सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. टीका झाल्यानंतर त्यांनी दुसरं ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं होतं. त्या ट्वीटनंतर प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता चांद्रयान ३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर त्यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चांद्रयान-३ ची खिल्ली उडवल्याने नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; प्रकाश राज दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले, “तुम्हाला विनोद समजला…”

“भारतासाठी आणि मानवजातीसाठी अभिमानाचा क्षण.. #ISRO #Chandrayaan3 #VikramLander आणि हे घडवून आणण्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्या प्रत्येकाचे आभार.. हे आपल्याला आपच्या ब्रह्मांडाचे रहस्य शोधण्यात आणि ते साजरे करण्यासाठी मार्गदर्शन करू शकेल,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

प्रकाश राज यांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

‘ओव्हरअॅक्टिंगचे ५० रुपये कापा’, ‘नक्कीच रडत रडत हे ट्वीट केले असेल’, ‘किती दुःखी होऊन तुम्ही हे ट्वीट केलंय’, ‘तुम्हाला लाज वाटते की विकली आहे’, ‘तुम्ही चहाचा स्टॉल कधी लावणार’, अशाप्रकारच्या कमेंट्स नेटकरी प्रकाश राज यांच्या ट्वीटवर करत आहेत. अनेकांनी त्यांनी केलेलं व्यंगचित्र कमेंट्समध्ये शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे.

प्रकाश राज यांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

चांद्रयान-३ ची खिल्ली उडवणं भोवलं, प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल

प्रकाश राज वादात अडकले ते ट्वीट कोणते?

प्रकाश राज यांनी २० ऑगस्ट रोजी एक ट्वीट केलं होतं. त्यात इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचं व्यंगचित्र होतं. ज्यामध्ये के सिवन हे चहा ओतताना दिसतात. ‘चंद्रावरून विक्रम लँडरने पाठवलेला पहिला फोटो, वॉव’ असं म्हणत त्यांनी हे व्यंगचित्र शेअर केलं होतं.

नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतरचं दुसरं ट्वीट

“द्वेष करणाऱ्यांना फक्त द्वेष दिसतो. मी आर्मस्ट्राँग टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या विनोदाचा संदर्भ देत होतो, जे आमच्या केरळच्या चहा विक्रेत्याचा आनंद साजरा करत होते. ट्रोल्सनी कोणत्या चहा विक्रेत्याला पाहिलं? जर तुम्हाला विनोद समजला नसेल तर हा विनोद तुमच्यावर आहे, मोठे व्हा” असं प्रकाश राज यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, यानंतर प्रकाश राज यांच्याविरोधात कर्नाकटमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash raj tweet after chandrayaan 3 successfully landed on moon netizens comments viral hrc