आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक झाली आहे. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान समोर नव्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. शाहरुख खान हा अनेक मोठंमोठ्या ब्रॅंडसाठी काम करतो. मात्र आर्यन खानला अटक झाल्यानंतर एका मोठ्या ब्रँडने शाहरुख खान सोबतच संबंध तोडल्याच वृत्त समोर आले होते.आता जाहिरातच्या जगातील लोकप्रिय नावं प्रलहाड कक्कर यांनी या बाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रल्हाद कक्कर हे जाहिरात दिग्दर्शक आहेत, यांनी अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांच्या अनेक जाहिरातीसाठी दिग्दर्शन केलं आहे. शाहरुख खानसोबत जे काही घडतं आहे हा निव्वळ एक ‘तमाशा’ आहे, असे त्यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत संगीतले. ते म्हणाले, “तुमचा ब्रँड अॅम्बेसेडरचा मुलगा ड्रग्ज करतो आहे, तुम्ही मुलांना काय शिकवता? असे म्हणत प्रतिस्पर्धी त्याचा वापर करू शकतात….. आर्यनला उगाचंच अडकवले जातं आहे आणि यातही राजकारण आहे, हे प्रत्येकाला समजले पाहिजे. शेवटी त्यांना आर्यनला सोडून द्यावे लागेल.” अभिनेत्याच्या ब्रॅंड व्हॅल्यूविषयी बोलताना ते म्हणाले, “शाहरुख खानची ब्रॅंड व्हॅल्यू आता पूर्वीइतकी राहिली नाही…जेव्हा त्याचे चित्रपट चालायचे तेव्हा त्याला लोकं पाहायला यायचे मजबूत नाही जितकी त्याच्या चित्रपटांमध्ये अधिक चांगली कामगिरी होती. आताच्या तुलनेत आधी त्याला पाहण्यात जास्त लोक उत्सुक होते, त्यामुळे आता त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू कमी झाली आहे. त्यामुळे मुलामुळे त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू कमी झाली आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल”, असे ते म्हणाले.

अजून एका लोकप्रिय व्यापार तज्ञ अतुल मोहन यांनी हे प्रकरण तात्पुरतं आहे असे सांगितले आहे. ते म्हणाले, “शाहरुख आणि त्याच्या कुटुंबासाठी हा एक कठीण काळ आहे, पण त्याचा त्याच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूवर परिणाम होणार नाही. हा काळ संपल्यावर तो पुन्हा नव्याने सुरूवात करुन उभा राहील, ”असे त्यानी एका मुलाखतीत सांगितले आहे.