कॉमेडियन प्रणित मोरे((Pranit More) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. विनोदांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रणितवर सोलापूरमध्ये हल्ला झाला होता. एका कार्यक्रमासाठी प्रणित मोरे सोलापूरमधील एका हॉटेलमध्ये आला होता. स्काय फोर्स या चित्रपटातून अक्षय कुमारबरोबर प्रमुख भूमिकेत दिसलेल्या वीर पहारियावर त्याने विनोद केला होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर त्याला जमावाने मारहाण केली होती. त्यानंतर प्रणित मोरेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता या घटनेनंतर कॉमेडियनने पहिल्यांदाच शो सादर केला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर त्याने शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रणित मोरेचं कमबॅक

प्रणित मोरे सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरूवातीला प्रणितवर हल्ला झाल्यानंतर विविध वृत्त वाहिनींवर त्याच्याबाबत ज्या बातम्या दाखवल्या गेल्या, त्याचे स्क्रीनशॉट पाहायला मिळत आहेत. त्यानंतर ऐकायला मिळते की तो येऊ शकेल का? तो ठीक आहे का? तो मॅनेज करू शकतो का? त्यानंतर प्रणित मोरेची एक झलक पाहायला मिळत आहे. जिथे त्याच्या एका हाताला दुखापत झालेली दिसत आहे. त्यानंतर तो स्टेजवर गेल्याचे पाहायला मिळते. याच व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की तो खुर्चीवर ठेवलेला माईक उचलतो व जमलेल्या प्रेक्षकांना संबोधत म्हणतो की हात तुटलाय, हिंमत नाही. त्याच्यापुढे अनेक प्रेक्षक बसले असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने “वो नफरत से लडते है, मैं हँसी से जीत जाता हूँ”, अशी कॅप्शन दिली आहे.

प्रणित मोरेच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करीत त्याचे कौतुक केले आहे. “भाऊ पुन्हा आलाय”, “घाबरून राहणार नाही”, “वाह”, “आम्ही नावाने नाही कामाने वीर आहे”, “मराठी माणूस”, “मस्त”, अशा कमेंट केल्या आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.

दरम्यान, वीर पहारियाने नुकतेच ‘स्काय फोर्स’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. अक्षय कुमार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. वीर पहारिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू असून उद्योजक संजय पहारिया आणि स्मृती पहारिया यांचा मुलगा आहे. अभिनेत्याने घडलेली घटना समजल्यावर आपणास धक्का बसला असून, या मारहाणीच्या घटनेशी आपला संबंध नाही. मात्र या घटनेबद्दल आपण प्रणित मोरे व त्याच्या चाहत्यांची माफी मागतो, असे मत सोशल मी़डियावर व्यक्त केले होते. अक्षय कुमारच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले.