बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान अनेक नवोदित कलाकारांसाठी गॉडफादर आहे. करिअर मार्गी लावणाऱ्या ‘भाईजान’ने आता दिवंगत अभिनेत्री नुतन यांची नात आणि अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनुतन बहल हिचं ही करिअर घडविण्यासाठी मदत केली आहे. सलमानच्या आगामी ‘नोटबुक’ या चित्रपटात प्रनुतन झळकणार असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये प्रनुतन आणि नवोदित अभिनेता जहीर झक्बाल झळकले आहेत. ट्रेलरमध्ये मैत्री, प्रेम आणि नात्यातील दुरावा यावर भाष्य करण्यात आलं आहे. नात्यातील विरह, ओढ या ट्रेलरमध्ये उत्तमरित्या मांडण्यात आली आहे.

दरम्यान, प्रदर्शित झालेला ट्रेलर केवळ प्रेक्षकांनाच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या देखील पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे. ‘नोटबुक’ असे शीर्षक असलेला हा चित्रपट पुढील वर्षी २९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान करत आहे, तर दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत.

 

Story img Loader