प्रार्थना बेहेरे ही मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज प्रार्थना बेहेरे ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे प्रार्थना बेहेरे ही नावारुपाला आली. सध्या ती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत नेहा हे पात्र साकारत आहे. प्रार्थनाच्या लग्नाला बराच काळ उलटला आहे. त्यामुळे अनेकदा प्रार्थनाला ‘तू आई कधी होणार?’ असा प्रश्न विचारला जातो. यावर तिने एका कार्यक्रमात स्पष्ट शब्दात उत्तर दिले होतं.

प्रार्थना बेहेरेने काही महिन्यांपूर्वीच सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमातील महिला वर्गाने तिला, “तू मालिकेत एका मुलीच्या आईचे पात्र साकारत आहे, तर मग खऱ्या आयुष्यात आई कधी होणार आहेस?” असा प्रश्न तिला विचारला होता. त्यावर तिने स्पष्टच शब्दात उत्तर दिलं होतं.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
prarthana behere complete 7 year of marriage recalls her first meeting
पाच तास गप्पा, पॅनकेक अन् २ किलो बटर…; अरेंज मॅरेज पद्धतीने जमलेलं प्रार्थना बेहेरेचं लग्न; पहिल्या भेटीत नेमकं काय घडलेलं?

आणखी वाचा- ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका लवकरच बंद होणार? प्रार्थना बेहरेच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

या प्रश्नाचं उत्तर देताना प्रार्थना म्हणाली, “माझ्या सासूबाईही हा शो बघत आहेत. पण मी काही वाईट काम करतेय का? पण मग हे सर्व झाल्यावर मला काम करता येणार नाही. नको ना…, हा विषय नको. मला खूप बाळं आहेत. आमच्या पाच पाळीव श्वान आहेत, १२ घोडे आहेत आणि मासे आहेत, दोन उंदीर आहेत, अशी खूप मुलं आहेत. त्याबरोबर मायरा माझी मुलगीच आहे.” तसेच पुढे तिने ‘मला माझी मुलं नकोत. मी या सगळ्यांबरोबरच फार खूश आहे’, असंही म्हटलं होतं.

आणखी वाचा- प्रार्थना बेहरेला बघताच परीला कोसळले रडू, जाणून घ्या नेमकं काय घडलं

दरम्यान सध्या प्रार्थना ही झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये नेहा कामत ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची देखील अधिक पसंती मिळत आहे. प्रार्थनाचा या मालिकेमधील लूक आणि तिची भूमिका प्रेक्षकांना खरं तर आपल्यापैकीच एक वाटत आहेत. म्हणूनच तिला या भूमिकेसाठी प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. पण लवकरट ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.