‘पवित्र रिश्ता’ मालिका आणि त्यानंतर ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मितवा’ यांसारख्या चित्रपटांतून नावारुपास आलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे लवकरच विवाहबद्ध होणार आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकरसह ती यावर्षी १४ नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. ऑगस्टमध्ये प्रार्थना आणि अभिषेक साखरपुडा करणार आहेत. विशेष म्हणजे आई-वडील आणि कुटुंबियांच्या पसंतीला होकार देत प्रार्थना अरेंज मॅरेज करतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका मॅरेज ब्युरोच्या मदतीने अभिषेक आणि प्रार्थनाची ओळख झाली. एका मुलाखतीत याबद्दल प्रार्थना म्हणाली की, ‘अभिषेक आणि माझ्या आवडी निवडी जवळपास सारख्याच असल्याने तो चांगला जोडीदार ठरू शकतो असं मला वाटलं. त्यामुळे त्याला पसंत केलं.’ हा लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडणार असून, डेस्टिनेशन वेडींग करण्याचे प्रार्थनाने ठरवले आहे. मात्र हे डेस्टिनेशन अद्याप ठरले नसून दोघेही चांगल्या लोकेशनच्या शोधात आहेत.

PHOTOS : आश्का-ब्रेंटचा देसी अंदाजात साखरपुडा

चित्रपट क्षेत्रातीलच जोडीदाराची निवड केल्याबद्दल प्रार्थना सांगते की, ‘अभिनेत्री व्हायचं माझं स्वप्न कधीच नव्हतं. मला लेखक किंवा दिग्दर्शक होण्यात रस होता. सतत फिटनेस आणि मेकअपबद्दल बोलणाऱ्या अभिनेत्यांमध्ये मी कधीच मिसळू शकत नाही. चित्रपट निर्मितीमध्ये मला जास्त आवड आहे. लेखक आणि दिग्दर्शकांसोबत गप्पा मारायला मला खूप आवडतं.’

प्रार्थनाने आधी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी चित्रपटातून पदार्पण करत प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रार्थनाचे ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ हे चित्रपटसुद्धा बरेच गाजले.