संकर्षण कऱ्हाडे हा मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार म्हणून ओळखला जातो. सोशल मीडियावर सक्रिय राहून तो नेहमीच त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो. आता सध्या तो ‘तू म्हणशील तसं’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ह्या नाटकाला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. नुकतीच प्रसाद ओक याने या नाटकाच्या प्रयोगाला हजेरी लावली आणि तेव्हा त्या दोघांच्यात काय संभाषण झालं हे संकर्षणने शेअर केला आहे.

‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचं दिग्दर्शन प्रसाद ओक यानेच केलं आहे. त्याच्यात दिग्दर्शनाचं प्रेक्षक नेहमीच सोशल मीडिया वरून कौतुक करत असतात. आता नुकतीच अचानक या नाटकाच्या एका प्रयोग आला प्रसाद ओक याने हजेरी लावली. परंतु तिथे पोहोचल्यावर प्रसादने संकर्षणला जे सांगितलं ते ऐकून संकर्षणचा अपेक्षाभंग झाला.

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

आणखी वाचा : ‘वेड’ पोहोचला सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर, आतापर्यंत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

संकर्षणने त्याचा आणि प्रसादचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं, “काल ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचे आमचे दिग्दर्शक प्रसाद ओक सर पुण्यात अचानक प्रयोगाला आले आणि मला म्हणाले किती झाले प्रयोग? मी आनंदाने म्हणालो २७५ होतील आता. मला वाटलं आता प्रसाद शाबासकी देईल आणि म्हणेल पार्टी करू. पण प्रसाद म्हणाला, ‘३०० पूर्ण झाले की, (पार्टी हाच शब्दं ऐकु येणार ह्याची खात्री मला पटली) २ दिवस परत रिहर्सल करु. म्हणजे मलाही कळेल की, तुम्ही मीच बसवलेलंच नाटक करता की नाही. असो, ब्रो भेटून गेला की मस्तं वाटतं.”

हेही वाचा : “खऱ्या अर्थानी ‘प्रेमाची गोष्ट’ सुरू झाली…” प्रसाद ओकसाठी पत्नीने केलेली पोस्ट चर्चेत

प्रसाद आणि संकर्षणमध्ये घडलेला हा किस्सा नेटकऱ्यांना चांगलाच आवडला. या फोटोवर कमेंट करत आता नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी कमेंट करत हसण्याचे इमोजी टाकले तर काहींनी कमेंट करत “प्रसाद तुम्हाला कधीही पार्टी देणार नाही,” “तुम्ही त्याच्याकडून पार्टीची अपेक्षा करू नका,” अशा कमेंट्स केल्या आहेत. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

Story img Loader