मराठी अभिनेता प्रसाद ओक ची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली. या भूमिकेमुळे प्रसाद ओकचे सर्वत्र कौतुक केले गेले. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं. प्रसाद ओकचा एक अभिनेता म्हणून धर्मवीर आनंद दिघे या भूमिकेपर्यंत पोहोचवण्याचा प्रवास आता सर्वांना जाणून घेता येणार आहे. त्याने या भूमिकेसाठी कशी तयारी केली, त्याची मेहनत, त्याला आलेले अनुभव या त्याच्या प्रवासावर त्याने एक पुस्तक लिहिले आहे. ‘माझा आनंद’ असं या पुस्तकाचं नाव असून नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आलं.
आणखी वाचा : “बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक…” म्हणत आदित्य ठाकरेंचं आनंद दिघेंना जयंतीनिमित्त अभिवादन

यानिमित्ताने प्रसाद ओकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी विविध फोटोही पोस्ट केले आहेत. यातील काही फोटोत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल माहिती देताना दिसत आहेत. यावेळी प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकही उपस्थित होती.

maharashtrachi hasya jatra team new film gulkand
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दोन्ही परीक्षक अन् ‘हे’ लोकप्रिय कलाकार झळकणार एकाच चित्रपटात! जाहीर केली प्रदर्शनाची तारीख
lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा…
New prashant damle new play
प्रशांत दामलेंचं नवीन नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीला! सोबतीला झळकणार हृषिकेश शेलारसह ‘हे’ कलाकार
Kashmera Shah accident
कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी, अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात
Neena Gupta husband vivek mehra is CA
नीना गुप्ता यांचे पती आहेत सीए, पत्नीच्या ‘या’ आर्थिक गुंतवणुकीची खिल्ली उडवतात विवेक मेहरा
Swapnil Rajshekhar And Rajshekhar
“एक डायलॉग ते चुकीचा बोलले तर भालजी पेंढारकरांनी पायावरती वेताच्या छड्या…”, स्वप्नील राजशेखर यांनी सांगितला वडिलांचा किस्सा
mrunal dusanis new restaurant shashank ketkar write special post
मृणाल दुसानिसच्या नव्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले ‘हे’ मराठी कलाकार! शशांक केतकर मैत्रिणीबद्दल म्हणाला, “जिद्द, मेहनत…”
bhagare guruji son akhilesh bhagare get married with vaishnavi Jadhav wedding video viral
Video: शुभमंगल सावधान! भगरे गुरुजींच्या मुलाचं थाटामाटात पार पडलं लग्न, पारंपरिक पद्धतीने झाला गृहप्रवेश, पाहा व्हिडीओ
Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ

प्रसाद ओकची पोस्ट

“श्री सिद्धिविनायक आणि मा. गुरुवर्य दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब, आणि मा. उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब, यांच्या हस्ते “माझा आनंद” या माझ्या पुस्तकाचं आज अनावरण झालं.

मा. दादा भुसे जी, आमचे निर्माते मित्र मंगेश देसाई, आमचे मित्र श्री सचिन जी जोशी, आणि माझी पत्नी मंजिरी ओक हे सर्व माझ्या सोबत या आनंदाच्या क्षणी उपस्थित होते. मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो”, असे प्रसाद ओक म्हणाला.

आणखी वाचा : आनंद दिघेंच्या जयंतीदिनी राजन विचारेंनी जारी केला खास व्हिडीओ; म्हणाले, “…हीच दिघे साहेबांना गुरुदक्षिणा”

या पुस्तकाला कोणत्याही राजकारणाचा गंध नाही. केवळ एका कलाकाराने भूमिका साकारतानाच्या प्रवासावर लिहिलेले हे पुस्तक आहे, असे प्रसाद ओक म्हणाला. या पुस्तकाचं प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे केले जाणार आहे. या पुस्तकाची प्रस्तावना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिली आहे. प्रज्ञा पोवळेनं या पुस्तकाचं शब्दांकन केलं आहे. तर सचिन गुरवनं याचे अक्षर सुलेखन केलं आहे.