मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. मनोरंजन विश्वात अभिनय व कौशल्याच्या जोरावर त्याने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. प्रसादने नाटकापासून अभिनयातील करिअरला सुरुवात केली होती. आज त्याने चित्रपट आणि टेलिव्हिजन या क्षेत्रांतही स्वतःचे असे नाव कमावले.

सध्या टेलिव्हिजनवर सुरू असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसाद ओक चांगलाच चर्चेत असतो. प्रसाद ओकबरोबरच त्याची पत्नी मंजिरी ओक हीसुद्धा या क्षेत्रात कार्यरत आहे. याबरोबरच हे दोघे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. नुकतेच मंजिरी ओक हिने प्रसादचा घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात प्रसाद त्याच्या घरातील पाळीव श्वान मस्कारा हिच्याशी गप्पा मारताना दिसत आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”

आणखी वाचा : मध्य प्रदेश सरकारने ‘The Kerala Story’ केला टॅक्स फ्री; राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले चित्रपट पाहायचे आवाहन

या व्हिडीओमध्ये प्रसाद मस्काराशी इंग्रजीत बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मंजिरीने लिहिले आहे की, “प्रसाद ते सगळे ठीकेय..पण तू इंग्लिश का झाडतोयस ?” प्रसाद जे काही बोलतो आहे ते ती मस्करा अगदी निमूटपणे ऐकत आहे आणि नंतर प्रसादला ती शेक हॅण्ड करतानाही दिसत आहे. प्रसाद ओकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

prasadoak1
फोटो : सोशल मिडिया
prasadoak2
फोटो : सोशल मिडिया

प्रसादच्या या व्हिडीओखाली बऱ्याच लोकांनी धमाल कॉमेंट केल्या आहेत. अमृता खानविलकर, क्रांती रेडकर, आदिनाथ कोठारे यांनीदेखील या व्हिडीओखाली हसण्याची इमोजी कॉमेंट केली आहे. याबरोबरच काही नेटकऱ्यांनी प्रसादचे इंग्रजी ऐकून भन्नाट कॉमेंट केल्या आहेत. एका युजरने कॉमेंट केली की “नक्की किती पेग झाले इंग्रजीचे?” एका युजरने लिहिले की, “दोन पेग जास्त झाले असतील तर आता तरी पार्टी दे.” शिवाय आणखी एका युजरने लिहिले की, “ही सगळी ओकस्मिथची कमाल नाही का?” एकूणच या धमाल कॉमेंट आणि प्रसादचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.