प्रशांत दामले यांनी तब्बल ३३ वष्रे केलेल्या नाटय़सेवेचा आणि संगीत सेवेचा गौरव म्हणून त्यांना मा. दीनानाथ पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल अशी घोषणा संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी केली. हा पुरस्कार एप्रिल महिन्यात लता मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान केला जाईल.
प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनची निर्मिती असलेले आणि जवळपास वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर झालेल्या ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाने शतकमहोत्सवी प्रयोग शनिवारी विलेपार्ले येथीस दीनानाथ नाटय़गृहात पार पडला. या प्रयोगास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांची कन्या राधा मंगेशकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.