अभिनेते प्रशांत दामले हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी रंगभूमी गाजवत आले आहेत. त्यांनी अनेक नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. आजही त्यांच्या नाटकांचे प्रयोग हाऊसफुल होताना दिसतात. अशातच एका नेटकऱ्याने त्यांच्या नाटकांवर स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली. तर त्याला प्रशांत दामले यांनीही उत्तर दिलं आहे.

प्रशांत दामले यांनी नुकताच त्यांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीतील १२ हजार ८०० नाट्यप्रयोगांचा टप्पा पार केला. याबाबत तीन-चार दिवसांपूर्वी त्यांनी एक खास पोस्ट शेअर करत सर्व नाटकांच्या प्रयोगांची आकडेवारी चाहत्यांना सांगितली होती. तर या निमित्त सध्या ते त्यांच्या काही जुन्या नाटकांतील प्रवेशांचे व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर करत आहेत.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Siddharth Statement on crowd of 'Pushpa 2'
‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचवेळी पाटण्यात जमलेल्या गर्दीवर सिद्धार्थचं वक्तव्य; म्हणाला, “जेसीबीचं काम सुरू असताना…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…

आणखी वाचा : “चांगले कार्य करताना काळे कपडे नसतात परिधान करायचे…”, चाहत्याच्या कमेंटवर प्रशांत दामलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

नुकतीच यांनी त्यांच्या ‘चार दिवस प्रेमाचे’ या नाटकातील एक छोटीशी व्हिडीओ क्लिप शेअर केली. हा व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट करत प्रशांत दामलेंच्या नाटकाबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि हा व्हिडीओ आवडल्याचं अनेकांनी सांगितलं. तर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “अहो दामले, तुमचं अभिनंदन आकडेवारी आहे म्हणून, पण दर्जा सुधारायला हवा. तोच तोच पाणचटपणा हसवत नाही हो.” त्यावर प्रशांत दामले यांनी उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं, “ओके.”

हेही वाचा : ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ला फालतू आणि दर्जाहीन म्हणणाऱ्याला प्रशांत दामलेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

तर आता या व्हिडीओवरील नेटकऱ्याची ही कमेंट आणि त्याला प्रशांत दामले यांनी दिलेलं हे उत्तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

Story img Loader