मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय अभिनेते म्हणजे प्रशांत दामले. गेली अनेक वर्ष दर्जेदार नाटकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना आनंद देत आहेत. त्यांच्या उत्स्फूर्त अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सध्या प्रशांत दामले हे ‘नियम व अटी लागू’ नाटक रंगमंचावर साकारताना दिसत आहे. नुकतंच यानिमित्ताने त्यांनी एक पोस्ट केली आहे.
गौरी थिएटर निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच सध्या सर्वत्र चर्चा आहे. सध्या इचलकरंजीमध्ये या नाटकाचे प्रयोग सुरु आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेते प्रशांत दामले यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : Video : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर मानसी नाईकने खरेदी केले नवीन घर, म्हणाली “या रखरखीच्या जगण्यात वावरताना…”
त्यात त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. य फोटोत काही प्रेक्षक मंडळी ही नाटकाची तिकीट खरेदी करताना दिसत आहेत. या फोटोला प्रशांत दामलेंनी हटके कॅप्शन देत त्यांचे कौतुक केले आहे.
“कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही… आणि ही गर्दी नाही, ही आहे ‘दाद’ दर्दी रसिकांची… ही आहे शिस्तप्रिय ईचलकरंजीकरांनी लावलेली रांग – महाराष्ट्रभर तुफान चाललेल्या ‘नियम व अटी लागू’ या खुसखूशीत नाटकाच्या तिकिट बुकिंगसाठी…”, असे प्रशांत दामले यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : “जिजा प्रेमात पडेल तेव्हा…” आदिनाथ कोठारेचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
दरम्यान ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे लेखन अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने केले आहे. तर याचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णींनी केले आहे. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.