अभिनेते प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. प्रशांत यांची विनोदीबुद्धी प्रेक्षकांची मने जिंकते. मराठी नाटक आणि खवय्यांसाठीचे खास कार्यक्रम हे ते नेहमीच रंगवतात. प्रशांत हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतीच प्रशांत यांनी एक पोस्ट शेअर केली. मात्र, या पोस्टवर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटने प्रशांत यांचे लक्ष वेधले आहे.
त्यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे लवकरच ५०० प्रयोग पूर्ण होणार आहेत. त्यासाठी त्यांनी एक पोस्ट त्यांच्या फेसबूकवर शेअर केली आहे. या पोस्टवरून त्यांना एका नेटकऱ्यांने ट्रोल केले आहे. नेटकरी त्यांना ट्रोल करत म्हणाला, काही तरी नवीन करा सर किती वर्ष तेच करणार. नेटकऱ्याच्या कमेंटने प्रशांत यांचे लक्ष वेधले आहे. या नेटकऱ्याला उत्तर देत प्रशांत म्हणाले, नोव्हेंबर २०१८ ला पहिला प्रयोग केलाय.. मधे २० महिने वाया गेले आहेत. तुम्हाला वाटतय ते एका लग्नाची गोष्ट.. हे “एका लग्नाची पुढची गोष्ट” हे नाटक आहे.
आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहिती आहे का?

आणखी वाचा : बिग बींचा दाऊद इब्राहिमसोबतचा फोटो व्हायरल? अभिषेकने दिले होते स्पष्टीकरण
मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही सदाबहार जोडी आणि त्यांची ऑनस्टेज केमिस्ट्री ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकात खरी पाहायला मिळत आहे. या नाटकाला प्रेक्षकांनी पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी पसंती दिली आहे. लॉकडाउननंतर जेव्हा हे नाटक रंगभूमीवर आलं तेव्हा प्रेक्षकांनी हे नाटक पाहण्यास पसंती दिली.