गेली चार दशकं नाटक, चित्रपट अन् टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं प्रशांत दामले हे नाव आपल्या सगळ्यांनाच परिचयाचं आहे. सध्या ते अखिल भारतीय नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबईचे अध्यक्ष म्हणूनही कारभार बघत आहेत. प्रशांत दामले यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. त्यांच्या नावावर पाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आहेत. फेब्रुवारी १९८३ पासून आजवर त्यांनी १२५०० पेक्षा जास्त नाटकांचे प्रयोग केले आहेत.

आज मराठी मनोरंजनसृष्टीत नाटकांचं महत्त्व टिकवून ठेवणाऱ्या काही मोजक्या कलाकारांच्या यादीत प्रशांत दामले यांचं नाव हे सर्वात आधी येईल. प्रशांत दामले हे अभिनेते उत्तम गायक तर आहेतच याबरोबरच ते एक उत्तम निर्मातेही आहेत. आपल्या याच नाट्यमय प्रवासाबद्दल नुकतंच प्रशांत दामले यांनी सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्ट शोमध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Milind Gawali
“कलाकारांनी एकतर लग्नच करू नये…”, मिलिंद गवळी असं का म्हणाले?
transgender marathi actor Pranit Hatte got married
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
Praveen Trade
Mahakumbh 2025: “अद्भुत अनुभव…”, प्रवीण तरडेंची पत्नीसह महाकुंभमेळ्याला हजेरी; व्हिडीओ केला शेअर, नेटकरी कौतुक करीत म्हणाले…
celebrity masterchef highest earning contestant tejasswi nikki tamboli usha Nadkarni
‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’साठी तेजस्वी प्रकाश घेते सर्वाधिक मानधन; तर निक्की तांबोळी, उषा नाडकर्णींना मिळतात ‘इतके’ पैसे
Marathi actress Prajakta Mali Praised to thet tumchya gharatun drama
“थेट तुमच्या काळजाला हात घालतं…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधल्या कलाकारांच्या ‘या’ नाटकाचं प्राजक्ता माळीने केलं कौतुक, म्हणाली, “ओंकारचं गाणं…”
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”

आणखी वाचा : “मी या गोष्टींकडे…” ‘कबीर सिंह’मध्ये परवानगी न घेता किस करण्याच्या सीनबद्दल संदीप रेड्डी वांगा प्रथमच बोलले

या मुलाखतीमध्ये प्रशांत दामले यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. नोकरी सांभाळत नाटकात काम करताना नेमक्या कोणत्या समस्या आल्या आणि त्यावेळी लग्न झाल्यानंतर घरच्यांनी या सगळ्याला पाठिंबा कसा दिला या प्रश्नाचं उत्तर प्रशांत दामले यांनी या पॉडकास्टमध्ये दिलं आहे. प्रशांत दामले म्हणाले, “२७ डिसेंबर १९८५ ला माझं लग्न झालं, १९८६ मध्ये मी माझं पहिलं ‘ब्रह्मचारी’ हे नाटक केलं. एकतर माझी पत्नी गौरीचा माझ्यावर असलेला विश्वास खूप महत्त्वाचा आहे. १९८७ मध्ये मला पहिली मुलगी झाली अन् १९९२ ला दुसरी मुलगी झाली. त्याचवर्षी मी नोकरी सोडली. त्याआधी मी ५ वर्षं बेस्टमधून मी सुट्टी घेऊन नाटक करायचो, या पाच वर्षांत आपण कसे जगलो याचं मी अन् माझ्या पत्नीने गणित मांडलं. माझ्या पगाराशिवाय आपण घर चालवू शकतो का याचा अंदाज घेतला.”

पुढे ते म्हणाले, “मला आठवतंय साधारणपणे गौरी ८५० रुपयांत घर चालवायची आणि कुठेही काही कमी नसायचं, तक्रार नसायची. मला पहिली नाइट २५ रुपये मिळाली होती, त्यानंतर ७५ रुपये झाली. विश्वास आणि व्यवस्थापन यामुळेच हे सगळं शक्य झालं. १९९२ ला जेव्हा ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाला पहिला हाऊसफूलचा बोर्ड लागला तेव्हा मी गौरीशी बोललो की आता बेस्टमध्ये आपली जागा फार काळ अडवून ठेवण्यात काही अर्थ नाही. माझ्याजागी तिथे दुसऱ्याला नोकरी लागू शकते, आता या नाटकावर आपण पुढे जाऊ शकतो, तेव्हा तिनेही मला प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मी नोकरी सोडून फक्त नाटकावर लक्षकेंद्रित केलं.”

प्रशांत दामले म्हणाले, “मी फक्त नाटकात काम करत होतो, अभिनय करत होतो, पण घर सांभाळणं हे खूप कठीण काम आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत घरातील स्त्री असंख्य कामं करते. टाइम मॅनेजमेंट ही स्त्रियांकडे उपजत असते. त्यात जर डोंबिवली ते मुंबई प्रवास करत नोकरी करणारी स्त्री असेल तर मला तिचे पायच धरावेसे वाटतात. इतकी वर्षं माझ्या शेड्यूलप्रमाणे माझ्या पत्नीने तिचं आयुष्य अॅडजस्ट केलं. तिने कोणत्याही समस्या माझ्यापर्यंत येउच दिल्या नाहीत.”

Story img Loader