अभिनेते प्रशांत दामले हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. प्रशांत दामले यांनी काही दिवसांपूर्वी १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग सादर केला. यानंतर त्यांच्याबद्दल अनेक कलाकार आणि दिग्गज व्यक्तींनी त्यांचे कौतुक केले होते. त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर पोस्टही शेअर केल्या होत्या. त्याचे प्रशांत दामलेंनी आभार मानले होते.
आता नुकतंच क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे प्रशांत दामले यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत. यात त्यांनी एका मित्राच्या पोस्टचा उल्लेख करत कमेंट केली आहे. प्रशांत दामले यांचे मित्र प्रसाद कुलकर्णी यांनी एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर प्रशांत दामलेंनी कमेंट केली आहे.
आणखी वाचा : “हर हर महादेव बघायला जाताना भीती…” आस्ताद काळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
प्रशांत दामले काय म्हणाले?
“मा सुनील गावस्कर ह्यांची एक आठवण… 1995-96 मधे माझ्या “बे दुणे पाच” ह्या नाटकाला मा सुनील गावस्कर आणि मा संदीप पाटील आले होते. नाटक झाल्यावर मला म्हणाले होते तु गुटगुटीत असूनही ह्या नाटकात तु मुंबई पुणे मुंबई पळतोस. असो. हे आज आठवलं कारण त्यांनी माझा मित्र प्रसाद ह्याने माझ्या 12500 प्रयोगाच्या निमित्ताने एक पोस्ट टाकली होती त्यावर मा सुनिलजीनी माझ्यासाठी एक पोस्ट टाकली ती इथे शेअर करतोय. धन्यवाद सुनिलजी”, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : नृत्यंगणा, अभिनेत्री ते राजकारण, ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणाऱ्या दीपाली सय्यद यांच्याबद्दल जाणून घ्या
दरम्यान ‘एका लग्नाची गोष्ट’ नाटकाचा हा प्रयोग सायनमधील श्री ष्णमुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे संपन्न झाला. या नाटकाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र काम करत आहे. त्यांनी नाटकांसह काही चित्रपटांमध्येही काम केले होते. या दोघांव्यतिरिक्त या नाटकामध्ये अतुल तोडणकर, प्रतीक्षा शिवणकर, मृणाल चेंबूरकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे हे कलाकार काम करत आहेत. अद्वैत दादरकरने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.