अभिनेता प्रतीक बब्बर बॉलिवूडमधील त्या कलाकारांपैकी एक आहे. ज्याला त्याच्या आई- वडिलांप्रमाणे यश मिळवता आलेलं नाही. प्रतीकनं त्याच्या खासगी आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले आहेत. बालपणी आईचं निधन, त्यानंतर मोठं झाल्यावर व्यसनाच्या आहारी जाणं, डिप्रेशन अशा बऱ्याच समस्यांना तोंड दिल्यानंतर प्रतीक आज बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती प्रतीकनं त्याचं ब्रेकअप आणि त्यानंतर आलेलं डिप्रेशन यावर भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतीकनं यावेळी अभिनेत्री अॅमी जॅक्सनसोबत त्याचं अफेअर आणि त्यानंतर झालेल्या ब्रेकअपविषयी सांगितलं. प्रती बब्बर आणि अॅमी जॅक्सन यांनी रोमँटीक चित्रपट ‘एक दिवाना था’मध्ये एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या सेटवर तो अॅमीच्या प्रेमात पडला आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. २०१२ मध्ये त्याच्या रिलेशनशिपच्या जोरदार चर्चा देखील झाल्या होत्या.

आणखी वाचा- “मला माहीत नाही हा चित्रपट…” The Kashmir Files वर हिना खानची प्रतिक्रिया चर्चेत

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत प्रतीकनं अॅमीशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात कशा समस्या आल्या आणि तिला कोणत्या कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला हे सांगितलं. प्रतीक म्हणाला, ‘मला वाटतं ‘एक दिवाना था’ हा एक उत्तम चित्रपट होता. पण मी या चित्रपटाच्या सेटवर अॅमीच्या प्रेमात पडलो आणि तिथेच सर्व बिघडलं. जेव्हा माझं ब्रेकअप झालं तेव्हाच माझ्या आयुष्यातला वाईट काळ सुरू झाला असं मी म्हणू शकतो. त्यावेळी मी फक्त २५ वर्षांचा होतो.’

आणखी वाचा- Sharmaji Namkeen Trailer : अखेरच्या चित्रपटात ऋषी कपूर यांचा दमदार अभिनय, ‘शर्माजी नमकीन’ ट्रेलर चर्चेत

या मुलाखतीत प्रतीकनं एक्स गर्लफ्रेंड अॅमीचं कौतुक केलं. तो म्हणाला, ‘ती या जगातली सर्वात सुंदर मुलगी आहे. तिचं मन खूप साफ आहे. ती एक साधी सरळ मुलगी आहे.’ दरम्यान प्रतीकनं या ब्रेकअपनंतर २०१९ मध्ये सान्या सागरशी लग्न केलं. तर अॅमी देखील तिच्या पार्टनरसोबत खुश असल्याचं पाहायला मिळतं. तिला एक २ वर्षांचा मुलगा देखील आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prateik babbar open up on his breakup with amy jackson and depression after that mrj