‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाचे, रोहित राऊत, आर्या आंबेकर या पंचरत्नांना अफाट प्रसिद्धी मिळाली. आजही हे पंचरत्न संगीत क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. सध्या या पंचरत्नांमधील प्रथमेश व मुग्धा भलतेच चर्चेत आले आहे. प्रथमेशने मुग्धाबरोबरचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करत सगळ्यांनाच एक आनंदाची बातमी दिली. फोटो पोस्ट केल्यानंतर दोघांवरही आनंदाचा वर्षाव होत आहे.

प्रथमेश व मुग्धा एकमेकांच्या प्रेमात आहे. आता त्यांनी स्वतः त्यांच्यामध्ये असलेल्या नात्याची कबुली दिली. प्रथमेशने फोटो शेअर करत या फोटोला छान कॅप्शनही दिलं. तो म्हणाली, “आम्ही दोघांनी मिळून नात्याची कबुली द्यावी अशी तुम्हा सगळ्यांची अपेक्षा होती. अखेरीस तो क्षण आला आहे. आमचं ठरलंय!” प्रथमेशच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर या दोघांच्याच नावाची चर्चा रंगत आहे.

jaideep ahlawat on nepotizam and alia bhatt
‘पाताल लोक’ फेम जयदीप अहलावतचे नेपोटिझमवर भाष्य; आलिया भट्टबद्दल म्हणाला, “त्यात तिची चूक काय?”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Kshitee Jog
“सरसकट निर्मात्यांना अक्कल नसते….”, क्षिती जोग निर्माती होण्याआधी ‘असा’ करायची विचार; स्वत:च सांगत म्हणाली, “हेमंत फार हळवा होऊन…”
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”
Marathi actor saurabh gokhale
“मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर…”; मराठी अभिनेता पोस्ट करत म्हणाला, “बेताल, बेलगाम…”

आणखी वाचा – लेह-लडाखला पोहोचले समीर चौघुले, फोटो पाहून प्राजक्ता माळीची कमेंट, म्हणाली, “दादा…”

अनेक सेलिब्रिटी मंडळींनी प्रथमेश व मुग्धाच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. तसेच आनंद व्यक्त करत दोघांनाही शुभेच्छा दिल्या. यावेळी सुकन्या मोने यांनी केलेल्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्या कमेंट करत म्हणाल्या, “कप्लना होतीच. पण नक्की ना…काहीतरी गुगली नाही ना?”.

आणखी वाचा – “दर्गा व चर्चमध्ये जातो आणि…” सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट पाहून नेटकऱ्यांचा संताप, अभिनेता म्हणतो, “भावा नीट वाच कारण…”

मुग्धाने सुकन्या मोने यांच्या कमेंटवर रिप्लाय केला. ती म्हणाली, “मावशी खूप आभार. नाही गं नाही”. सुकन्या मोनेंना या गोड बातमीवर विश्वास बसत नव्हता. अखेरीस मुग्धाने कमेंट करत खरं काय ते सांगितलं. प्रथमेश व मुग्धाने त्यांच्यामध्ये असलेल्या नात्याची कबुली देत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

Story img Loader