‘सोनी मराठी’ वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळय़ा मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता प्रतिशोध ही मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. निरनिराळय़ा चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळय़ा भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अभिनेते अमोल बावडेकर आता एका वेगळय़ा भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. प्रतिशोधह्ण या नव्या कोऱ्या मालिकेतून अमोल बावडेकर तृतीयपंथी आईची भूमिका साकारणार आहेत. ममता असे या व्यक्तिरेखेचे नाव असून त्यांच्याबरोबर पायल मेमाणे ही गुणी अभिनेत्रीसुद्धा मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ती ममताच्या मुलीची म्हणजेच दिशाची व्यतिरेखा साकारताना दिसणार आहे.

‘प्रतिशोध’ ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी थरारक मालिका आहे. भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळेल. एक आगळंवेगळं कथानक असलेली ही मालिका सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. येत्या १६ जानेवारीपासून रात्री १० वाजता. ‘प्रतिशोध’ – झुंज अस्तित्वाची ही नव्या पठडीतली मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे. या मालिकेत तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं उलगडणारी कथा आणि त्यांच्या  संघर्षांची कहाणी आहे.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा
IFS, UPSC, girl opt IFS, IAS IPS, Vidushi Singh,
आयएएस, आयपीएसचा पर्याय सोडून आजीआजोबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आयएफएसची निवड

नव्या मालिकेतील अमोलची तृतीयपंथीची भूमिका त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरली आहे. अशा धाटणीची भूमिका प्रथमच साकारण्याची संधी मिळाल्याने तो ही भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे. मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हे आगळंवेगळं कथानक पाहून प्रेक्षकांनी या मालिकेचं स्वागत केलं आणि अमोलच्या भूमिकेला पसंतीही दर्शवली. अरुण नलावडे आणि अक्षय वाघमारे हे कलाकारही  या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.