टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येमागचे गूढ अद्याप उकलले नाही. मात्र, तिच्या आत्महत्येमागे तिचा प्रियकर राहुल राज सिंग कारणीभूत असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल राज सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, चौकशीनंतर राहुल राज सिंगची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुलच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रत्युषाने स्वतहून आत्महत्या केली नसून तिला प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. प्रत्युषा-राहुल राहत असलेल्या घरापासून अवघ्या पाच मिनिटांवर महापालिकेचे सिद्धार्थ रुग्णालय आहे. तिथे प्रत्युषाला नेण्याचे सोडून राहुलने तिला थेट २५ किलोमीटर लांब अंधेरीच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात का नेले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. या वेळी गोंधळलेल्या अवस्थेत आपल्याला जे सुचले ते केले, असे राहुलने सांगितल्याचे कळते. दरम्यान, पोलिसांनी राहुल-प्रत्युषाचे मोबाइल जप्त केले असून त्यांची तपासणी करत आहेत.

Story img Loader