गेल्या काही दिवसांपासून विनोदाच्या दुनियेतील हुकुमी एक्के असलेले भाऊ कदम व कुशल बद्रिके मुख्य भूमिकेत असलेला ‘पांडू’ हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबात उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ‘पांडू’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पांडू’ चित्रपटाच्या १ मिनिटे २२ सेकंदाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला प्रवीण तरडे एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत. त्यानंतर भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना हसू अनावर होईल. त्यानंतर सोनाली कुलकर्णीने अनेकांची मने जिंकली आहेत. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आहे.
आणखी वाचा : सलीम खान लग्न करुन हेलन यांना घरी घेऊन येताच अशी होती सलमानची प्रतिक्रिया

पांडू या चित्रपटाची कथा आहे दोन मित्रांची. पांडू आणि महादू हे कोल्हापूरचे लोककलावंत. वगनाट्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचं काम दोघेही करतायत. एक दिवस नशिबाची अशी काही संधी चालून येते की या दोघांनाही मुंबईत नोकरी मिळते तेही हवालदाराची. पांडू तसा साधाभोळा आणि अगदी भाबडा तर महादू हा त्याच्या अगदी विपरीत चतुर आणि चाणाक्ष, दुनियादारी समजणारा. मुंबईत आल्यावर पांडूंच्या आयुष्यात येते केळी विकण्याचा व्यवसाय करणारी डॅशिंग गर्ल उषा. आसपासच्या स्वार्थी आणि मतलबी दुनियेत पांडूसारखी भोळी आणि साधी माणसंही असतात या गोष्टीचं तिला कौतुकही वाटतं आणि याचमुळे ती पांडूच्या प्रेमातही पडते.

हा चित्रपट पूर्णतः विनोदी अंगाने जाणारा असून तो प्रेक्षकांना खळखळून हसवेल आणि त्यांचा ताण दूर करेल असा विश्वास झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांना वाटतो. अवधूत गुप्ते यांच्या संगिताने सजलेल्या पांडूची गाणी सर्वत्र लोकप्रिय झालेली आहेत, बुरुम बुरुम ने २० लाख व्ह्यूज तर केळेवाली गाण्याने अवघ्या २४ तासात १० लाख व्ह्यूज मिळवलेत. चित्रपटाचा हा ट्रेलरही पांडूबद्दल अधिक उत्सुकता निर्माण करेल अशी आशा चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केली. येत्या ३ डिसेंबरला हा चित्रपट राज्यभरात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praveen tarde bhau kadam pandu trailer out avb