मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांना ओळखलं जातं. ‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’ असे त्यांचे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. त्यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता प्रवीण यांना त्यांच्या कामामधून निवांत वेळ मिळाला आहे. म्हणूनच ते पत्नी स्नेहल तरडेबरोबर लंडन येथे सुट्टी एण्जॉय करताना दिसत आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – साखरपुडा, ब्रेकअप अन् पुन्हा २० वर्षांनी लग्न, जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेकचा विवाहसोहळा संपन्न

मराठी भाषा, संस्कृतीबाबत प्रवीण तरडे यांना विशेष प्रेम आहे. त्यांचं बोलणं, वागण्यामधून ते दिसून येतंच. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात ते गेले तरी त्यांना मराठी संस्कृतीचा विसर पडत नाही. लंडनमध्ये देखील त्यांनी आपली मराठमोठी संस्कृती जपली आहे. लंडन दौऱ्यादरम्यान प्रवीण तरडे त्यांच्या पत्नीसह मरोठमोळ्या लूकमध्ये नाटक पाहायला पोहोचले. यादरम्यानचा त्यांनी एक व्हिडीओ फेसबुक अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये प्रवीण यांनी म्हटलं की, “लंडनमध्ये आम्ही ‘लायन किंग’ हे नाटक पाहायला आलो आहोत. नाटक पाहायला जायचं म्हणजे पारंपरिक वेशभूषा छान पाहिजे. आपण कुठून आलो आहोत हे इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे. तसंच माझ्या पत्नीने केसात गजरा माळला आहे. पारंपरिक वेशभूषा म्हटलं की गजरा पाहिजेच. चला मंडळी ‘लायन किंग’ नाटकाचा आनंद घेतो. नाटक पाहणं ही मराठी लोकांची संस्कृती आहे.”

आणखी वाचा – “मी एकटीच का? तुम्हीही…” प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट

या व्हिडीओमध्ये स्नेहल तरडे यांनी नाकात नथ, पारंपरिक साडी, दागिने परिधान केले आहेत. तसेच केसात गजरा माळला आहे. तर प्रवीण तरडे यांनी शिवमुद्रा प्रिंट असलेलं जॅकेट परिधान केलं आहे. मराठी सेलिब्रिटी कपलच्या या नव्या व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin tarde and his wife snehal at oxford street in london to watch lion king play wear traditional dress video goes viral on social media kmd