डॉ. सलिल कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेला ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये अनेक कसदार अभिनेते आहेत. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे कॉमेडीचा बादशहा म्हणून ओळख असलेले ‘चला हवा येऊ द्या’फेम भाऊ कदम, लेखक-दिग्दर्शक व ‘मुळशी पॅटर्न’फेम प्रवीण तरडे आणि आघाडीची सर्जनशील अभिनेत्री मुक्ता बर्वे हे तिघे कलाकार प्रथमच एकत्र दिसणार आहे. यांच्याबरोबर शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार हे कलाकार सुद्धा या चित्रपटात झळकणार आहेत. ‘वेडिंगचा शिनेमा’ १२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

भालचंद्र पांडुरंग कदम हे भाऊ कदम म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय आहेत. १९९१मध्ये आपल्या कारकिर्दीला रंगभूमीपासून सुरुवात करून आज भाऊ कदम नाटकांबरोबरच मराठी आणि हिंदी चित्रपट आणि मालिकांमधील एक आघाडीचे कलाकार म्हणून सर्वज्ञात झाले आहेत. प्रवीण विठ्ठल तरडे हे एक मराठी नाट्य-चित्रपट-मालिका लेखक व दिग्दर्शक म्हणून परिचित आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ या सध्या गाजत असलेल्या मराठी चित्रपटाची कथा, पटकथा त्यांनी लिहिली होती आणि दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. त्यांनी अनेक चित्रपट, दूररचित्रवाणी मालिकांचे लेखन, दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.

water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
Massive fire breaks out at scrap warehouses in Mandala area
मंडाळा परिसरात भंगाराच्या गोदामांना भीषण आग, आगीत ६ ते ७ गोदाम जळून खाक
narendra modi
पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील साहित्य संमेलनाचे उद्घाटन
Loksatta chadani chowkatun Rajya Sabha Prime Minister Narendra Modi Constitution Amit Shah
चांदणी चौकातून: कुठं आहे ती राज्यसभा?
Tender for Abhyudayanagar redevelopment extended till December 30
अभ्युदयनगर पुनर्विकासाच्या निविदेला ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
Gondavalekar Maharaj punyatithi mahotsav ,
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पुण्यतिथी महोत्सव गोंदवल्यात सुरू

मुक्ता बर्वे या मराठी नाट्य आणि चित्रपट चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. आपल्या वैविध्यपूर्ण आणि सहज अभिनयाने मुक्ताने रसिकांच्या मनात प्रेमाचे स्थान मिळवले आहे. टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक अश्या तिन्ही माध्यमांवर जबरदस्त पकड असणा‍‍‍र्‍या अत्यंत मोजक्या अभिनेत्रींमध्ये मुक्ताचे स्थान अग्रक्रमावर आहे.

पारंपारिक रीतीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाफ आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणारा बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’ १२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेला टीझर आणि तीन गाणी यांना रसिकांकडून भरपूर प्रतिसाद लाभला आणि चित्रपटाबद्दल खऱ्या अर्थाने हवा निर्माण झाली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एका लग्नाची तयारी, त्यासाठी केले जाणारे प्री-वेडिंग चित्रीकरण, घरातील माणसांची नृत्याची तयारी, चालीरीतींवरील चर्चा या गोष्टी ट्रेलरमधून पुढे येतात.

या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहे. सलील कुलकर्णी यांनी कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल. ‘वेडिंगचा शिनेमा’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरुआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीची आहे.

Story img Loader