लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांचा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट आजही चर्चेचा विषय ठरतो. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. याच चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान दिसला आहे. पण सलमानच्या कास्टिंगवर प्रविण यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक वक्तव्य केले आहे.
आणखी वाचा : जुना वाद विसरून सलमान आणि अभिषेक एकत्र? व्हायरल फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘ऐश्वर्या…’
प्रवीण नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग विषयी बोलत होते. “मुळशी पॅटर्न हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारित बनवलेला चित्रपट आहे. ‘मुळशी पॅटर्न’च्या माध्यमातून मला शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी आली होती, परंतु काही कारणांमुळे ती पूर्ण झाली नाही. हा चित्रपट जर प्रवीण तरडेने बनवला असता तर या चित्रपटाचे नाव आणि कथानक कधीच बदलले नसते. हिंदीमध्ये देखील मी चित्रपटाचे नाव ‘मुळशी पॅटर्न’ ठेवले असते. मी स्वत: मुळशी गावचा आहे. एकेकाळी शेतीवर जगणारं हे सधन गाव मी अनुभवलं. मी जगलो आणि त्या विषयावर मी काम केले आहे. त्यामुळे या चित्रपटात मी सलमान खानला कधीच घेतले नसते. कारण सलमान या भूमिकेसाठी कधी सूट झाला नसता,” असे प्रवीण तरडे म्हणाले.
आणखी वाचा : “मी अनुष्कासोबत पुन्हा सेक्स सीन…”, रणवीर सिंगने केलेलं खळबळजनक वक्तव्य
आणखी वाचा : मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या Arangetram सोहळ्यात, सलमान- आमिरसोबत ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी
चित्रपटातील कलाकारांच्या निवडीवर विचारलेल्या प्रश्नावर प्रवीण म्हणाले, ‘माझ्या चित्रपटांमधील कलाकारांची निवड ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे.
आणखी वाचा : “जेव्हा माझे करिअर खडतर टप्प्यातून जात होते…”, सलमानने सांगितला बोनी कपूरसोबतचा ‘तो’ किस्सा
दरम्यान, प्रवीण तरडे यांचा नुकतेच दोन चित्रपट म्हणजेच सरसेनापती हंबीरराव आणि धर्मवीर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.