प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट २७ मे २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने प्रवीण तरडे, महेश लिमये आणि टीमने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या पडद्यामागचे किस्से सांगितले. तसेच या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात आलेल्या घोड्याचा किस्सा तर आश्चर्यचकित करणारा होता.

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट हा मराठीमधील सर्वाधिक महागडा चित्रपट आहे. हिंदी चित्रपटासाठी वापरण्यात येणारे घोडे या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात आले आहेत. याचबाबत प्रविण तरडे यांनी खुलासा केला आहे. “बजेट पाहता मराठीमधील हा आजवरचा सगळ्यात महागडा चित्रपट आहे. कारण ऐतिहासिक सिनेमांचा बजेट हाच हिरो असतो. आम्ही जे या चित्रपटासाठी घोडे वापरले त्यांचा दिवसाचा खर्च हा कलाकारांच्या मानधनापेक्षा अधिक होता. मुंबईवरुन हे घोडे एसी ट्रकमध्ये सेटवर आले. घोड्याचा सीन शूट करून झाला की पुन्हा तो एसी ट्रकमध्ये जायचा.” असं प्रविण तरडे यांनी सांगितलं.

Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Vallari Viraj
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीने शेअर केले बालपणीचे गोंडस फोटो; नेटकरी म्हणाले, “अशीच आयुष्यभर…”
Milind Gawali And Teja Devkar
पैसे संपले, अभिनेत्रीला कल्पना न देता निर्माते झाले पसार; नेमकं काय घडलेलं? मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
Kushal Badrike
“कवीने संसारात अडकू नये…”, कुशल बद्रिकेने शेअर केला पत्नीबरोबरचा व्हिडीओ; श्रेया बुगडे कमेंट करीत म्हणाली…

आणखी वाचा – अभिनेत्री कंगना रणौतला झटका, कोट्यावधी रुपये खर्च करूनही ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉप

पुढे बोलताना ते म्हणाले की, “अजय देवगणने ‘तानाजी’ चित्रपटासाठी जी घोडी वापरली तिच मी या चित्रपटासाठी वापरली. रोल साऊंड असं घोडीने ऐकलं की ती तयार होते आणि एक्शन म्हटलं की पळते. घोडीबरोबर असणारा माणूस तिला या सगळ्या सूचना देत असतो. कट म्हटलं की ही घोडी लगेच थांबते, आपल्याकडे काही कलाकारांना कट म्हटलं की थांबायचं हे अजूनही कळत नाही. पण घोडी मात्र कट शब्द ऐकताच थांबते. घोडीचं डाएट देखील वेगळं होतं. आम्ही खरं तर हा सगळा खर्च सहन केला. पण यासगळ्या गोष्टींसाठी खर्च हा लागतोच आणि त्यासाठी बजेट देखील हवा.”

आणखी वाचा – Photos : वयाची ४०शी उलटली अन् लंडनमध्ये सुप्रसिद्ध गायिकेनं थाटामाटात केलं दुसरं लग्न, फोटो आले समोर

प्रवीण तरडे ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाबाबत भरभरून बोलत होते. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’बाबत उस्तुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन, कथा, पटकथा-संवाद लेखन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तसेच गश्मीर महाजनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसेल.