‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ नंतर धर्मवीर हा चित्रपट घेऊन प्रवीण तरडे घेऊन येत. या चित्रपटानंतर लगेच प्रवीण तरडे आणखी एक चित्रपट घेऊन प्रवीण तरडे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटातून सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा डोळ्यांसमोर उभी राहणार आहे. या चित्रपटाचं नावं बलोच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. पानिपतच्या पराभवांनंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांनी अनुभवलेल्या भयाण वास्तव्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. पोस्टरमध्ये बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे दिसत आहेत. या सर्वांमध्ये प्रवीण तरणे यांची करारी मुद्रा सर्वांच्या नजारा खिळवून घेणारी आहे. त्यांच्या डोळ्यांतील धगधगणारी आग अनेक भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता ‘बलोच’च्या निमित्ताने पुन्हा एकदा इतिहासातील आठवणींना उजाळा मिळणार आहे.

आणखी वाचा : प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा ते अक्षय कुमार…, सेलिब्रिटी ‘या’ साइड बिझनेसमधून कमावतात कोट्यावधी रुपये

आणखी वाचा : युक्रेनमध्ये पोहोचलेल्या अँजेलिना जोलीसमोर लहान मुलाने केले असे काही, व्हिडीओ Viral

या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटात प्रवीण तरडे यांची प्रमुख भूमिका असून कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स प्रस्तुत, जीवन जाधव, महेश करवंदे (निकम) संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, जितेश मोरे, सहनिर्माते गणेश शिंदे, दत्ता काळे, सुधीर वाघोले, विजय अल्दार निर्मित हा चित्रपट दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच ५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin tardes upcoming movie baloch poster released on the occasion of maharashtra day dcp