बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आलिया आणि रणबीर १४ एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले. आई होणार आहे ही आनंदाची बातमी आलियाने काल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली. त्यानंतर सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसी आणि करिअर विषयी चर्चा सुरु झाल्या. एका न्यूज पोर्टलने असा दावा केला आहे की आलियाचं शूटिंग संपल्यानंतर रणबीर तिला न्यायला जाणार आहे. शिवाय, त्यात असेही म्हटले आहे की आलियाने तिच्या प्रेग्नेंसीची योजना अशा प्रकारे केली आहे की तिच्या प्रोजेक्ट्सवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. हे वाचल्यानंतर आलिया संपातली आहे आणि तिने या न्यूज पॉर्टलला सडेतोड उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का
आलियाने एका वृत्त वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या बातमीचा स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा स्क्रिनशॉट शेअर करत आलिया म्हणाली, “यादरम्यान अजूनही काही लोकांना वाटतं की आपण पुरुषप्रधान जगात राहतो…कोणत्याच गोष्टीला उशीर करण्यात आलेला नाही! कोणालाही वेगळा अर्थ घ्यायची गरज नाही. मी एक स्त्री आहे, पार्सल नाही! मला अजिबात आराम करण्याची गरज नाही, पण तुमच्या सगळ्यांकडे डॉक्टर असल्याचे प्रमाणपत्र आहे हे जाणून चांगलं वाटलं. आपण २०२२ मध्ये आहोत, कृपया आपण या जुन्या विचारसरणीतून बाहेर पडू शकतो का? मला माफ करा मला जावं लागेल कारण माझा शॉट रेडी आहे.” आलियाची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
आणखी वाचा : “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर
पाहा फोटो
आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा
दरम्यान, आधी अशा चर्चा होत्या की शूटींगमध्ये व्यग्र असलेली आलिया लवकरच लंडनवरून मुंबईत येणार आहे. रिपोर्टनुसार असे म्हटले आहे की जुलैअखेर पर्यंत ‘आलिया रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘हार्ट ऑफ स्टोन’ चे चित्रकरण पूर्ण करणार आहे.