गेले काही दिवस राणी मुखर्जी माध्यमांपासून दूर दूर राहत आहें. ती गरोदर असल्यामुळे माध्यमांपासून दूर राहत असल्याची चर्चा ही रंगू लागली होती. पण, ही बातमी खरी असल्याची आता पुष्टी झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


राणी मुखर्जीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. फ्लोरल मॅक्सी ड्रेस परिधान केलेली राणी यात दिसते. तिच्यासोबत अजून काही व्यक्तीही दिसत आहेत. पण, ते नक्की कोण आहेत हे सांगता येत नाही. त्यापैकी राखाडी टीशर्टमधील व्यक्ती आदित्य चोप्रा असण्याची शक्यता आहे. अलीकडेच राणीची वहिनी आणि टीव्ही अभिनेत्री ज्योती मुखर्जीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राणी गरोदर असल्याचे सांगितले होते. पुढच्यावर्षी जानेवारीत तिचे बाळंतपण होईल. राणी मुखर्जीने २०१४मध्ये निर्माता आदित्य चोप्रासोबत लग्न केले. या लग्नाच केवळ त्यांचे जवळचे मित्र सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pregnant rani mukerji shows off her baby bump