जगातील श्रीमंत टी-२० क्रिकेट लीग म्हणजे आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी दोन दिवस मेगा ऑक्शन होत आहे. आज या महालिलावाचा पहिला दिवस आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत. बंगळुरु येथे होणाऱ्या या लिलावात पंजाब किंग्स सहमालक प्रिती झिंटा सहभागी होणार नसल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतर आता प्रिती झिंटा घरबसल्या लिलावाचा आनंद घेण्यासाठी सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच तिने पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रिती झिंटाने नुकतंच इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यात तिने मेगा लिलावाचा आनंद घेण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. यात तिने तिच्या घरात बाळाला कुशीत घेतल्याचा एक फोटो शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना ती म्हणाली की, “टाटा आयपीएल लिलाव पाहण्यासाठी मी सज्ज आहे. यावेळी लिलावाच्या पेडलऐवजी माझ्या कुशीत गोंडस बाळ आहे. ही एक मोठी भावना आहे. माझे हृदय जोरजोरात धडधडत आहे. मी पंजाब किंग्जच्या नवीन संघाची अजून प्रतीक्षा करु शकत नाही. ऑल द बेस्ट”. प्रितीने शेअर केलेली ही पोस्ट सध्या तुफान व्हायल होत आहे.

त्यासोबत प्रितीने आयपीएल लिलावातील एक फोटो रिपोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करताना ‘लाईट्स, कॅमेरा, ऑक्शन’ असे तिने म्हटले आहे. अभिनेत्री प्रिती झिंटा ही काही दिवसांपूर्वी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली. सध्या प्रिती ही मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. त्यामुळे प्रिती झिंटाला भारतात येणे शक्य नाही आणि याच कारणामुळे प्रितीला आयपीएलमध्ये सहभागी होता येणार नाही.

IPL Auction 2022 Live : कोण होणार करोडपती? महालिलावाला सुरुवात!

प्रितीने ट्विटरवर आयपीएल लिलावामधील एक फोटो पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शन देताना ती म्हणाली, ‘यंदा मी आयपीएल लिलावात भाग घेऊ शकणार नाही. कारण मी माझ्या लहान मुलांना सोडून भारतात येऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून मी आणि माझी टीम लिलाव, क्रिकेटच्या इतर सर्व गोष्टींवर एकत्र चर्चा करण्यात व्यस्त होती. त्यामुळे मला ही माहिती माझ्या चाहत्यांना सांगायची होती.’

“पण त्यासोबत मला माझ्या चाहत्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. त्यांना आमच्या नवीन संघासाठी खेळाडूंच्या निवडीबाबत काही सूचना किंवा शिफारसी द्यायच्या आहेत का? यंदा तुम्हाला कोणाला लाल जर्सीमध्ये पाहायचे आहे, हे मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल”, असेही ती म्हणाली.

IPL Mega Auction 2022 : पंजाब किंग्जला धक्क्यावर धक्के..! प्रीती झिंटानं घेतला ‘असा’ निर्णय

प्रिती झिंटा नुकतीच सरोगसीद्वारे आई बनली आहे. करोनाचा संसर्ग पाहून प्रिती झिंटाने आयपीएल लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्जने यंदाच्या हंगामासाठी मयंक अग्रवालला १२ कोटी रुपये आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला ४ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. पंजाब किंग्जचा संघ सर्वाधिक ७२ कोटी रुपये घेऊन आयपीएल मेगा लिलावात उतरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preity zinta is excited to watch ipl auction with baby in arms check her adorable post nrp
Show comments