गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाच्या लग्नाविषयीच्या बातम्या माध्यमातून झळकताना दिसत आहेत. अखेर प्रितीने अमेरिकेतील तिचा प्रियकर जेन गूडइनफशी लग्नगाठ बांधल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं. तशाप्रकारचे ट्विट ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी पोस्ट केले आहे. ‘चोरी चोरी चुपके चुपके’ चित्रपटातील या अभिनेत्रीला लग्नाच्या शुभेच्छा देणारे ट्विट कबीर बेदी यांनी टि्वटरवर पोस्ट केले आहे. सुझान खान आणि डिझायनर सुरिली गोएलबरोबर गेल्या काही दिवसांपासून प्रिती लॉस एंजेलिसमध्ये लग्नाच्या तयारीत व्यस्त होती. अतिशय गुप्ततेत पार पडलेल्या या लग्नाला कुटुंबातील जवळचे सदस्य आणि मित्र परिवार उपस्थित होता.
HUGE CONGRATS my friend @realpreityzinta on your marriage to Gene in Los Angeles, City of Angels. Blessings! pic.twitter.com/NLBEIY6fS7
— KABIR BEDI (@iKabirBedi) March 1, 2016
प्रितीच्या लग्नाच्या अफवा टि्वटरवर पसरत होत्या, परंतु कबीर बेदी यांच्या ट्विटने यावर शिक्कामोर्तब केले. प्रितीची खास मैत्रीण सुझान खान आणि सुरिली गोएलनेदेखील काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केली आहेत. लग्नाच्या छायाचित्रांच्या माध्यमातून उभारण्यात येणारा निधी प्रिती झिंटा सामाजिक कार्यासाठी वापरणार असल्याच्या बातम्या माध्यमातून झळकत होत्या. लग्नसमारंभाच्या या खासगी छायाचित्रांचा लिलाव करून त्यातून उभा राहाणारा निधी ‘प्रिती झिंटा फाऊंडेशन’ला देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
Graciasmadre #melrose #Mexican #vegan #makeawish #loveLA
A photo posted by Surily Goel (@surilygoel) on