Preity Zinta : बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आपल्या विधानामुळे कायम चर्चेत असते. तसेच प्रिती झिंटा प्रत्येक छोट्या-मोठ्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. आता नुकतीच प्रिती झिंटाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत ट्रोल देखील केलं आहे. ‘तुम्ही तुमच्या पंतप्रधानांची स्तुती करत असाल तर तुम्ही भक्त आहात’, असं अभिनेत्री प्रिती झिंटाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

प्रिती झिंटाने काय म्हटलं?

अभिनेत्री प्रिती झिंटाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “सोशल मीडियावर लोकांचं काय होत आहे की सर्वजण एवढे निंदक झाले आहेत. जर कोणी एआय बॉटशी त्यांच्या पहिल्या चॅटबद्दल बोललं तर लोक समजतात की हे पेड प्रमोशन आहे. जर तुम्ही तुमच्या पंतप्रधानांचं कौतुक करत असाल तर तुम्ही भक्त आहात आणि जर तुम्ही गर्विष्ठ हिंदू किंवा भारतीय असाल तर तुम्ही अंध भक्त आहात”, असं प्रिती झिंटाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री प्रिती झिंटाच्या या पोस्टवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर टिप्पणी करताना एका यूजर्सने म्हटलं आहे की “अशा पोस्टमुळे ट्रोलर्सना प्रोत्साहन मिळतं. जर ट्रोल केलं नसतं तर तुम्ही कधी पोस्ट केली असती का? सेलिब्रिटींच्या अशा प्रतिक्रिया ट्रोल्सला प्रोत्साहन देतात? तुमच्या चाहत्यांसाठी कठीण गोष्टी सोप्या करा. ट्रोल करून निराश होण्याऐवजी आणि एआय इत्यादींसोबत तासनतास गप्पा मारण्याऐवजी आमच्यासाठी ते अधिक चांगले करा”, असं एका यूजर्सने म्हटलं आहे.

दरम्यान, युजरला उत्तर देताना अभिनेत्री प्रिती झिंटाने म्हटलं आहे की, “आम्हाला वाटतं की तुम्ही लोक विसरलात की आम्ही तंत्रज्ञानाने मोठे झालो नाही. त्यामुळेच ते एलियनसारखे वाटत आहे आणि एआयबद्दल खूप उत्सुकता आहे. मला वास्तविक संभाषणाची कदर आहे आणि मी माझ्या लहान मुलांमध्ये व्यस्त असल्यामुळे मला ऑनलाईन जाण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. पूर्वी आम्ही खूप छान गप्पा मारायचो. आम्ही काही विषय निवडायचो आणि प्रत्येकजण त्या विषयावर बोलत असे. आशा आहे की मला जास्त वेळ मिळेल तेव्हा मी त्या गप्पांमध्ये परत येईन”, असं प्रिती झिंटाने युजरला उत्तर देताना म्हटलं.

Story img Loader