भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर काँग्रेसच्या खासदार प्रिया दत्तविरोधात निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या साफ खोट्या असल्याचे बॉलीवूडची अभिनेत्री प्रिती झिंटा हिने सांगितले आहे. दिवंगत खासदार आणि अभिनेते सुनील दत्त यांची कन्या असलेल्या प्रिया दत्त यांच्याविरोधात उत्तर-मध्य मुंबईमधून प्रिती झिंटाला उमेदवारी देण्याचे भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा यापूर्वी रंगली होती. तसेच या उत्तर-मध्य मुंबईत प्रिया दत्त यांच्याविरोधात सेलिब्रिटी उमेदवार उभा करण्याचे प्रयत्न भाजपतर्फे केले जात होते. तसेच प्रिती झिंटा भाजपचे सचिव असणा-या राजीवप्रताप रूडी यांची दूरची नातलग असल्याने ती निवडणुकीला लढवणार असल्याच्या अनेक अफवांना ऊत आला होता.  

Story img Loader