धनादेश न वटल्याप्रकरणी दाखल तक्रारीच्या सुनावणीला चारवेळा समन्स बजावूनही हजर न होणारी अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्याविरुद्ध अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी अखेर अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. त्याचबरोबर तिला पाच हजारांचा दंडही सुनावला आहे. गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या प्रीतीच्या ‘इश्क इन पॅरिस’ या चित्रपटाचे संवादलेखक अब्बास टायरवाला यांनी तिच्याविरुद्ध १८ लाख रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र चारवेळा समन्स बजावूनही प्रीती न्यायालयासमोर हजर झाली नाही. अखेर न्यायालयाने तिच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. हे वॉरंट रद्द करण्यासाठी महादंडाधिकाऱ्यांकडे अथवा उच्च न्यायालयात धाव घेऊ, असे तिच्या वकिलांनी नंतर स्पष्ट केले.
प्रीती झिंटाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट
धनादेश न वटल्याप्रकरणी दाखल तक्रारीच्या सुनावणीला चारवेळा समन्स बजावूनही हजर न होणारी
First published on: 13-09-2013 at 01:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preity zinta to face arrest non bailable warrant issued against actress