बॉलीवूडची ‘डिंपल गर्ल’ अशी ख्याती असणारी प्रिती झिंटा जेने गुडेनफ या आपल्या अमेरिकन प्रियाकरासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. प्रितीने काही दिवसांपूर्वी या वृत्ताचे जोरदार खंडन केले असले तरी सूत्रांच्या माहितीनुसार, प्रिती आणि जेने थोड्याच दिवसांत अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये विवाह करणार आहेत. लग्नानंतर बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकांसाठी मुंबईत लग्नाचा स्वागत समारंभ असेल, अशी माहिती आहे. दरम्यान, प्रिती आणि जेने या लग्नसोहळ्याची छायाचित्रांचे हक्क विकून त्यामधून आलेला पैसा सामाजिक कार्यासाठी दान करणार असल्याचीही चर्चा आहे. अतिशय गुप्तपणे पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्यास दोघांच्या परिचयाच्या अतिशय जवळच्या व्यक्ती उपस्थित राहाणार आहेत.

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे राहणारा जेने व्यवसायाने ‘फायनान्शियल अॅनेलिस्ट’ असून प्रितीपेक्षा एक वर्षांनी लहान आहे. त्याची आणि प्रितीची पहिली ओळख अमेरिकेत झाली. बऱ्याच काळापासून दोघांचे जवळचे संबंध आहेत. प्रितीच्या संघाचा उत्साह वाढविण्यासाठी यावर्षी जेनेने ‘आयपीएल’ सामन्यांना उपस्थिती लावली होती. याआधी प्रितीचे नाव प्रसिद्ध व्यावसायिक नेस वाडियाबरोबर जोडले गेले होते.

Story img Loader