बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणून प्रीति झिंटाला ओळखले जाते. प्रीति झिंटा हिने आपल्या दमदार अभिनयाने आणि परफॉर्मन्सने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सध्या प्रीति ही मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. प्रीति तिच्या दोन्ही मुलांसोबतचे प्रत्येक क्षण छान एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे.

नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुलांसोबत एक फोटो शेअर केला आहे. यात तिच्या मुलांचा चेहरा दिसत नसला तरी हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी तिने जय आणि जियाला निळ्या आणि गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्याचे दिसत आहे. या फोटोत समोर असलेल्या टीव्हीवर ‘बॉब बिस्वास’ हा चित्रपट लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रीति ही तिच्या दोन्ही मुलांसह अभिनेता अभिषेक बच्चन याचा ‘बॉब बिस्वास’ हा चित्रपट एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हा फोटो शेअर करताना प्रीतिने याला हटके कॅप्शन दिले आहे. यावेळी ती म्हणाली, ‘माझ्या मुलांसोबतचा पहिला चित्रपट…OMG बच्चन, तुम्ही आमचा शनिवारी छान केलात.’ यासोबतच तिने या चित्रपटातील अभिषेकच्या भूमिकेचे कौतुकही केले आहे. ‘फार छान चित्रपट आहे आणि त्यात अभिषेकने किलर परफॉर्मन्स दिला आहे,’ असेही प्रीति म्हणाली.

हेही वाचा : “मला हे सर्व आवडतंय”, खास पोस्टसह प्रीति झिंटाने शेअर केला बाळाचा पहिला फोटो

दरम्यान प्रीति झिंटाने तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान जीन गुडइनफसोबत गुपचूप लग्न केले. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी लॉस एंजलसमध्ये अगदी खाजगी सोहळा करत तिने हे लग्न केलं. प्रीति आणि जीनने अतिशय गुपचूप लग्न केलं होतं. त्यांच्या वेडिंगचे फोटो जवळपास सहा महिन्यांनी मीडिया समोर आले होते. आता लग्नाच्या जवळपास पाच वर्षांनंतर प्रीति आई झाली. तिला सरोगसीद्वारे जुळ्याची मुले झाली आहेत. त्या दोघांची नावे जय आणि जिया अशी आहेत.

Story img Loader