या आठवड्यात चित्रपट शौकिनांना दोन वेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहण्याची संधी आहे. प्रिती झिंटाचा ‘इश्क इन पॅरिस’ आणि ‘विणा मलिकचा ‘जिंदगी ५०-५०’ शुक्रवारी प्रदर्शित झालाय.
ब-याच उशीरा का होईना अभिनेत्रीतून निर्माती बनलेल्या प्रितीचा ‘इश्क इन पॅरिस’ सिनेमागृहांमध्ये दाखल झाला. या चित्रपटात प्रितीने नव्या चेह-याला संधी दिली आहे. ‘इश्क इन पॅरिस’मध्ये मुख्य भूमिकेत स्वत: प्रिती, रेहान मलिक व फ्रेंच अभिनेत्री इसाबेल अदजनी आहेत. ‘इश्क इन पॅरिस’ हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल, असा विश्वास प्रितीने व्यक्त केलाय.
दिग्दर्शक प्रेम राज यांनी ‘इश्क इन पॅरिस’ चित्रपटात पॅरिसमध्ये दोन अनोळखी व्यक्तीची भेट घडवून आणली आहे. प्रेक्षकांना चित्रपटाते चित्रिकरण आवडेल, असा त्यांना विश्वास आहे. हा चित्रपट नोव्हेबर २०१२ मध्येच प्रदर्शित होणार होता. मात्र, प्रेम राजच्या आजारपणामुळे चित्रपटाचे चित्रिकरण थांबवावे लागले होते. प्रितीने चित्रपट पूर्ण करण्यासाठी इतके दिवस थांबण्याचा धोका पत्करल्यामुळे प्रेम राजने तिचे आभार मानले आहेत.
दुस-या बाजूला विणा मलिकची प्रमुख भूमिका असलेला ‘जिंदगी ५०-५०’ही शुक्रवारी प्रदर्शित झाला. ‘जिंदगी ५०-५०’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस. रूइया यांनी हा चित्रपट हिंदी, मल्याळम, तेलगू आणि तमिळमध्ये एकाच वेळी प्रदर्शित करण्याची काळजी घेतली आहे. या चित्रपटात रिया सेनचीदेखील भूमिका आहे. विणा मलिकने ‘जिंदगी ५०-५०’ चित्रपटात देहविक्रय करणा-या महिलेची भूमिका केली आहे. पाकिस्तानी अभिनेत्री असलेल्या विणाला या चित्रपटाकडून ब-याच अपेक्षा आहेत. राजन वर्मा या चित्रपटातून विणासोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या जाहिरातीचा भाग म्हणून ‘जिंदगी ५०-५०’ च्या चमूने मुबईच्या लालबत्ती भागात निरोध वाटपाचा कार्यक्रम राबवला होता.

Story img Loader