प्रेमाला भाषा नसते, जात नसते, धर्म नसतो … असते ती फक्त भावना …. आणि या एका भावनेच्या भोवती प्रेमी युगलांचं अख्ख आयुष्य एकवटलेलं असतं. झी युवावर २७ फेब्रुवारीपासून सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता एक नवी कोरी प्रेमाच्या विविध गोष्टी सांगणारी मालिका सुरु होत आहे. “प्रेम हे ” प्रेमात असलेल्या , आणि नसलेल्या प्रत्येकासाठी ही मालिका आहे. प्रेम करणे सोपे आहे पण ते निभावणे तेवढेच कठीण असते, असे म्हटले जाते. तरीही प्रेम करणारे प्रेम करतच राहतात. प्रेम हे केवळ आपल्या जोडीदाराला मिळवणं नसत. त्या व्यक्तिसाठी मनाला पटेल आणि नातं टिकवेल असे सर्व करण्याची तयारी असते आणि कुठच्याही कारणाने आपल्या आवडत्या व्यक्तिला गमवावं लागलं तर मात्र ही गोष्ट आपल्यासाठी खूप कष्टप्रद आणि त्रासदायक ठरू शकते. प्रेमाच्या अश्या असंख्य भावना अनेकांच्या मनात धुमसत असतात. शहरातील लोक बऱ्याच अंशी बोलून मोकळी होतात पण ग्रामीण भागात आजही अनेकांच्या प्रेमकहाण्या या अव्यक्तच राहिल्या आहेत. याच विषयाला धरून “प्रेम हे” या मालिकेची पहिली गोष्ट आहे “रुपेरी वाळूत “. एका गावात राहणारे सुनील आणि राधिका (वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान) , एकमेकांवर प्रेम तर करतात पण त्यांच्यासाठी व्यक्त होणं तितकसं सोपं नसतं. मग त्यांना जोडणारी आणि त्यांच्यातील प्रेम फुलवणारी गोष्ट म्हणजे एक गाणं “रुपेरी वाळूत …” आणि या गाण्याबरोबर त्यांचं फुलत जाणार पण अव्यक्त प्रेम आणि याचबरोबर त्यांच्या प्रेमात आडवं येतं घर, समाज , गाव.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा