रेश्मा राईकवार

काही काही विषय चित्रपटात कथारूपात पाहायला मिळतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ आपण नेहमी अवतीभवती अनुभवत असतोच, मात्र त्या प्रवृत्तीची गोष्ट म्हणून जेव्हा तुम्हाला रोजच्या जगण्यातली गोष्ट नव्या दृष्टिकोनातून पाहायला मिळते तेव्हा काही तरी नवीन पाहायला मिळणार, ही अपेक्षा आपल्याला सुखावून जाते. ‘प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित झालेला नितेश तिवारी दिग्दर्शित ‘बवाल’ पाहताना एका क्षणी तुमची ही उत्सुकता शिगेला पोहोचते आणि दुसऱ्याच क्षणी लेखक-दिग्दर्शक कथेची गरज म्हणून आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या घटनांची सफर घडवून आणतो. या दोन वेगवेगळय़ा गोष्टी एकत्र आणण्यामागे काहीएक भावनिक धागा कदाचित कर्त्यांना जाणवला असावा, प्रेक्षक म्हणून आपल्याला काही तो सापडत नाही आणि मग उगाचच नस्ती उठाठेव कशाला केली म्हणून आपल्याच मनात दंगा होतो.

devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Girl Juggling On Chandra Song Vs Beatboxing
‘चंद्रा’ गाण्यावर चिमुकलींची जुगलबंदी! ठसकेबाज लावणीला बीट बॉक्सिंगची साथ; VIDEO पाहून अमृता खानविलकरची कमेंट, म्हणाली…
Paaru
Video: पारूचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पद आदित्य वाचवू शकणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस
pachadlela movie inamdar wada after 20 years look what is history
Video : ‘पछाडलेला’ सिनेमातील जुना वाडा आठवतोय का? कुठे आहे ‘ही’ जागा? फक्त ‘ती’ वस्तू मिसिंग, नेटकऱ्यांनी अचूक हेरलं…

‘बवाल’ची मांडणी काहीशी वेगळय़ा पद्धतीची आहे. नितेश तिवारी यांचे दिग्दर्शन असल्याची जाणीव या काही पहिल्या मिनिटांतच आपल्याला होते. अभिनेता वरुण धवनने याआधीही थोडय़ाशा टपोरी आणि कानपूरसारख्या शहरांतील तरुणांच्या भूमिका केल्या आहेत. मात्र इथे हा नायक थोडा वेगळा आहे. अज्जू भैय्या नावाने प्रसिद्ध असलेला लखनौमधल्या एका शहरातला हा तरुण. दिमाखात बुलेटवरून फिरणारा, राजिबडा असल्याचा आवेशच ठायी ठायी भरून राहिलेला.. सगळय़ातलं सगळं कळतं असा सर्वज्ञानी असल्याचा भाव चेहऱ्यावर घेऊन फिरणारा आणि त्याच विश्वासावर इतरांची मनं जिंकून घेणारा अज्जू प्रत्यक्षात बुद्धी आणि वृत्ती दोन्हीच्या बाबतीत यथातथाच आहे. शाळेतही शिक्षक म्हणून आपण किती थोर आहोत हे विद्यार्थ्यांकडून वदवून घेण्यात अज्जू सर कमालीचे यशस्वी ठरले आहेत. आपली ही खोटी प्रतिमा कुठल्याही कारणाने गळून पडता कामा नये, आपला खरा चेहरा लोकांसमोर आला तर बवाल होईल ही अज्जूची भीती.. याच खोटय़ा प्रतिमेच्या आणि प्रतिष्ठेच्या नादात निशासारख्या एरवी सुंदर, चारचौघांत मिरवता येईल अशा हुशार तरुणीशी तो लग्नाला होकार देतो. आपल्याला एपिलेप्सीचा आजार आहे हे निशाने सांगितल्यावरही तो फारसं गांभीर्याने घेत नाही. मात्र लग्नाच्या पहिल्याच दिवशी निशाला फिट येताना पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकते. इथून पुढे अजयचा खऱ्या अर्थाने स्वत:शीच संघर्ष सुरू होतो.

अत्यंत अप्रामाणिक आणि अत्यंत प्रामाणिक, निरागस अशा दोन टोकांच्या स्वभाव असलेल्या व्यक्ती जेव्हा नात्यात बांधल्या जातात तेव्हा नेमकं काय होतं.. ही नवीन नसली तरी काहीशी आकर्षक कथाकल्पना ‘बवाल’मध्ये आहे. मात्र त्याहीपेक्षा अजयसारख्या आपल्याच प्रतिमेत कैद असलेल्या व्यक्तींचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांना असा मुखवटा घेऊन का वावरावंसं वाटतं? आणि खरोखरच एखादी चांगली व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आली तर त्यांच्या मूळ वृत्तीत बदल होऊ शकतो? अजयचे आई-वडीलही प्रयत्न करून थकतात.. मात्र त्याच्यातला तिरसटपणा कमी होत नाही की तिऱ्हाईतपणा.. असे किती तरी पैलू या कथेला आहेत. मात्र एका वळणावर येऊन कथा नेहमीच्या बॉलीवूडी परिचित शैलीत बदलते. इथे आणखी एक समांतर गोष्ट आहे. अजयच्या आयुष्यात घडणाऱ्या एका प्रसंगामुळे निशा आणि तो पडद्यावर आणि आपण पडद्यासमोर बसून अचानक दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणी आणि संदर्भामध्ये शिरतो. पॅरिस, बर्लिन, अॅमस्टरडॅम, नॉर्मण्डी, ऑश्विझ अशा ठिकठिकाणी अजय आणि निशा फिरतात. इतिहासात जे काही वाचलं ते प्रत्यक्ष मुलांना तिथे स्वत: जाऊन दाखवण्याचा हा अजयचा प्रयत्न असतो. या प्रयत्नांमागचा मूळ उद्देश पुन्हा त्याच्या स्वार्थी स्वभावात आहे. मात्र या दोन्ही गोष्टींची जुळवाजुळव करणं प्रेक्षकांना गोंधळात टाकल्याशिवाय राहात नाही. या चित्रपटाची कथा लेखिका अश्विनी अय्यर तिवारी यांची आहे. अश्विनी स्वत: उत्तम दिग्दर्शिका आहे. दुसऱ्या महायुद्धात हिटलरने केलेली छळवणूक, छळछावण्यांमध्ये असलेल्या लोकांनी अक्षरश: आपल्या घरातून उचलून आणलेली कुठली तरी एखादीच वस्तू उराशी बाळगत जगण्याचा केलेला संघर्ष या सगळय़ाचा संदर्भ देताना लेखिकेने कुठे तरी आपल्याला आपल्या आत डोकावण्यासाठी वाव देण्याचा प्रयत्न निश्चित केला आहे. त्याचा काही प्रमाणात उलगडा अजय आणि निशा यांच्या संवादातून होतो. आपण सतत एकमेकांशी भांडत राहतो, माझ्याकडे हे नाही, ते नाही म्हणून स्वत:वरच वैतागतो, चिडतो, असलेली नाती उधळून लावतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नॉर्मण्डीच्या किनाऱ्यावर उतरलेलं दोस्त राष्ट्राचं सैन्य आणि जर्मनीचं सैन्य यांच्यातला संघर्ष, हजारो सैनिकांचा जीव गेला.. त्या काळरात्री नॉर्मण्डीच्या किनाऱ्यावरचा रक्ताचा चिखल, अॅन फ्रँकच्या वेदना या सगळय़ा प्रसंगांचा तिथे उभं राहून अनुभव घेणारा अजय काही प्रमाणात आतून हलतो, बदलतो, असं काहीसं दाखवण्याचा हेतू असावा.

मात्र मुळात ज्या घटना संदर्भ म्हणून येतात त्या यापेक्षा अधिक व्यापक आहेत. त्यामुळेच की काय काहीसा बादरायण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे असं वाटत राहतं. या प्रसंगांचं चित्रीकरण करताना दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी ‘रंग दे बसंती’ चित्रपटातील तंत्र वापरलं आहे. त्यामुळे हा भाग चांगला झाला आहे; पण तो अधिक उठावदार होऊ शकला असता. या सगळय़ा मोठमोठय़ा बाजू सांगताना मूळ गोष्टीच्या हळव्या बाजू लेखक- दिग्दर्शक द्वयी हरवून बसली आहे. अजय-निशापेक्षा अजयच्या आईवडिलांची व्यक्तिरेखा अधिक वास्तवदर्शी आणि प्रभावीपणे रंगवली गेली आहे. या चौघांमधला संवाद हाही खरं तर चित्रपटातील प्रभावी भाग होऊ शकला असता; पण युरोपवारीच्या नादात या गोष्टी मागे पडतात. बाकी निशाच्या प्रेमात पडण्यासाठी काही तेच तेच ठोकळेबाज प्रसंग आणि घटनांची रेलचेल आहे. प्रेमकथा होऊ शकली असती. त्याला आनुषंगिक उत्तम संगीताची काहीशी कमी चित्रपटात जाणवते. वरुण धवन अज्जूच्या भूमिकेत चपखल बसला आहे. जान्हवी कपूरची व्यक्तिरेखा मुळात लिखाणातच कमजोर आहे. त्यामुळे खरं तर ठाम भूमिका असलेली नायिका वाटय़ाला येऊनही चित्रपट अखेर अज्जूच्याच गोष्टीत रमतो. तरीही नितेश तिवारीसारखे उत्तम दिग्दर्शक कायम काही तरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत आले आहेत. ‘बवाल’ हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. काहीसा रंजक आणि थोडा चाकोरीपेक्षा वेगळा प्रयत्न म्हणून हा चित्रपट उत्तम पर्याय आहे.


बवाल दिग्दर्शक – नितेश तिवारी,
कलाकार – वरुण धवन, जान्हवी कपूर, मनोज पहावा, अंजुमन सक्सेना, मुकेश तिवारी, प्रतीक पचोरी.

Story img Loader