सध्या सुरु असणारे लग्नसराईचे वारे फक्त भारतापुरताच मर्यादित राहिले नसून परदेशातही याच वाऱ्यांची धूम पाहायला मिळत आहे. अगदी ब्रिटनच्या राजघराण्यापर्यंतही लग्नसराईचे वारा पोहोचले आहेत. कारण, प्रिन्स हॅरी Prince Harry लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल Meghan Markle यांच्या शाही लग्नसोहळ्याचा थाट नेमका कसा असेल याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. १९ मे रोजी हा लग्नसोहळा पार पडणार असून त्याची पत्रिका सर्वांसमोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या लग्नपत्रिकेची डिझाइन अत्यंत साधी पण तितकीच सुरेख ठेवण्यात आली आहे. या लग्नसोहळ्यासाठी ६०० जणांना आमंत्रित करण्यात आले आहे.

वाचा : विराटचा दीपिकासोबत जाहिरात करण्यास नकार; आरसीबीला ११ कोटींचा फटका?

चार महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर हॅरीने मेगनला लग्नाची मागणी घातली होती. शाही घराण्यात घालून देण्यात आलेल्या नियमांप्रमाणे हॅरीला मेगनशी लग्न करण्यासाठी ब्रिटनच्या राणीची रितसर परवानगी घ्यावी लागली. राजघराण्यात शाही मुकुटाचे मानकरी असणाऱ्यांमध्ये हॅरी पाचव्या क्रमांकावर असल्यामुळेच चित्रपट अभिनेत्रीसोबत विवाहबद्ध होण्यासाठी त्याला राणीची परवानगी घ्यावी लागली होती. त्यानंतर काही दिवसांनीच राणीच्या सहमतीनेच हॅरी आणि मेगनचा साखरपुडा पार पडला होता.