Prithviraj Official Trailer : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. सध्या तो त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे पोस्टर, टीझर प्रदर्शित झाल्यापासून अनेक चाहते ट्रेलरची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे २०१७ ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

अक्षय कुमारने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामद्वारे या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित झाल्याची घोषणा केली आहे. शौर्य आणि पराक्रमाची अजरामर गाथा…सम्राट पृथ्वीराज चौहान यांची कथा, असे कॅप्शन देत अक्षयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २ मिनिट ५३ सेकेंदाचा आहे. या ट्रेलरची सुरुवात १२ व्या शतकापासून सुरु होते. यात पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसत आहे. यात पृथ्वीराज चौहान यांनी शौर्याने युद्धे कशी जिंकली आणि दिल्लीची सुल्तानी कशी मिळवली हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यातील लढाईचे दृश्यही पाहायला मिळत आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?

दीपिका पदुकोण लवकरच देणार गुडन्यूज? रणवीर सिंह म्हणाला “आम्ही बाळाचे नाव…”

या चित्रपटाच्या ट्रेलर अॅक्शन सीन्सने खचाखच भरलेला आहे. यातील अनेक दृश्य बघून अंगावर काटा उभा राहतो. यशराज फिल्म्सच्या बॅनर खाली बनलेला हा चित्रपट ३ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. तर आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

प्रियांका चोप्रा-निक जोनसची लेक १०० दिवसांनी परतली घरी, फोटो शेअर करत म्हणाली “आमचे बाळ…”

या चित्रपटात अक्षय कुमार हा पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त मानुषी छिल्लर, सोनू सूद आणि संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाद्वारे सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे. येत्या ३ जून २०२२ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader