सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावरून सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे. याबरोबरीनेच प्रभासच्या आगामी ‘सालार’ या चित्रपटाचीही चांगलीच चर्चा आहे. केजीएफचे मेकर या चित्रपटाची निर्मिती करत असून प्रभासचे चाहते यासाठी चांगलेच उत्सुक आहेत. काही महिन्यांपूर्वी यामधला प्रभासचा लुक प्रदर्शित झाला होता.

आता यापाठोपाठ प्रभासबरोबर आणखी एका अभिनेत्याचा फर्स्ट लुक समोर आला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील पृथ्वीराज सुकूमारनचा फर्स्ट लूक समोर आणला आहे आणि याचीच चर्चा सध्या सोशल मिडियावर होताना दिसत आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेता म्हणून पृथ्वीराजला ओळखलं जातं. ‘सालार’मध्ये पृथ्वीराज वर्धराज मन्नार या भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे.

आणखी वाचा : बॉलिवूड चित्रपटांवर ‘कांतारा’ची कुरघोडी; पहिल्या दोन दिवसांत केली बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई

पृथ्वीराजचा हा लूक पाहून चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. चित्रपटात प्रभास आणि पृथ्वीराज हे दोघेही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि या दोघांमध्ये चांगल्याच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत असं चित्रपट निर्मात्यांचं म्हणणं आहे. काही लोकांनी पृथ्वीराजचा हा लूक पाहून ‘केजीएफ २’मधील संजय दत्तच्या पात्राची आठवण काढली आहे.

पृथ्वीराजविषयी बोलताना दिग्दर्शक प्रशांत नील म्हणाले, “पृथ्वीराजसारख्या अभिनेत्याला घेऊन आम्हाला प्रचंड आनंद होतोय. वर्धराज मन्नार या पात्रासाठी पृथ्वीराजसारखा दूसरा अभिनेता मिळणं कठीण आहे. हे पात्र केवळ तोच साकारू शकतो. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रभास आणि पृथ्वीराज या दोघांबरोबर काम करण्याचा अनुभव अद्भुत होता यात काहीच संदेह नाही.”

प्रभासचा हा चित्रपट KGF युनिव्हर्सशी जोडला जाणार आहे. याविषयी दिग्दर्शक प्रशांत निल यांनी काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही. KGF प्रमाणेच सालारसुद्धा पॅन इंडिया लेव्हलवर प्रदर्शित होणार आहे. प्रशांत नील यांचा हा ‘सालार’ २८ सप्टेंबर २०२३ या दिवशी चित्रपटगृहात झळकणार आहे.

Story img Loader