अभिनेत्री प्रिया बापट मराठी सिनेसृष्टीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने बऱ्याच मराठी मालिका, नाटकं, वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनय क्षेत्रात नाव कमावणारी प्रिया बापट सोशल मीडियावरही तेवढीच सक्रिय असते. अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होताना दिसतात.
प्रिया बापटचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या प्रसारमाध्यामाच्या सहाय्याने अनेकदा आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. आपल्या कामाबरोबरच प्रिया तिच्या रोजच्या आयुष्यातील घडामोडींबद्दलही सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही तिने अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची बरीच चर्चा आहे.
आणखी वाचा- “नवरा-बायकोमधील संवाद…” प्रिया बापटने शेअर केलेल्या व्हिडीओने वेधलं लक्ष
प्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये प्रियाने लिहिलं, “माझे आई -बाबा मूळचे कोकणातले. आई राजापुरची आणि बाबा देवगडचे. त्यामुळे लहानपणी आमच्या प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही कोकणात असायचो. चुलीवरचा मेतकुट भाताची न्याहारी, झाडावर चढून जांभळं, कैऱ्या चोरणे, दुपारी पत्ते खेळणे, संध्याकाळी गुळ-दाणे सोबत घेऊन पेडावर जाणे, रात्री अंगणात झोपून चांदण्या पाहणे.२० वर्षांनी राजापूरला गेले. जिथे आईचा जन्म झाला, ती मोठी झाली. माझं बालपणं पुन्हा जगले.”
आणखी वाचा- “तुमच्याकडे पैसे कमी असतील तरी…” प्रिया बापटची ‘ती’ पोस्ट चर्चेत
या व्हिडीओमध्ये कोकणाची झलक प्रियाने तिच्या चाहत्यांना दाखवली आहे. निसर्ग सौंदर्य, रम्य संध्याकाळ आणि तिथलं ग्रामीण जीवन या सगळ्या गोष्टी या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तर प्रिया बापट धम्माल मस्ती करताना दिसत आहे. प्रियाच्या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलं, “कोकण! ज्यांचं बालपण कोकणात गेलं आहे ते लकी असतात” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं, “खूप खूप मस्त वाटलं प्रिया ताई तुझा हा व्हिडिओ बघून. माझं बालपण आठवलं.”