मराठी चित्रपटसृष्टीतील उमेश कामत आणि प्रिया बापटची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्या दोघांना एकत्र पाहिलं की त्यांचे चाहते त्यांना ‘Made for each other’ आणि ‘Couple Goal’ असे म्हणतात. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. उमेश आणि प्रियाच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने प्रियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या लग्नातला आहे. प्रिया आणि उमेश दोघेही उखाणा घेताना दिसत आहे. सुरुवातीला उमेश उखाणा घेतो आणि बोलतो, “कांती जिची सुरेख, रुप जिचे अलवार.. प्रिया माझी रत्नजडीत तलवार” उमेशचा हा उखाणा ऐकल्यानंतर लग्नात उपस्थित असलेले सगळ्या पाहूण्यांना हसू अनावर होते. त्यानंतर पुढे प्रिया उमेशसाठी उखाणा घेते, “सारेगमपच्या सुरांचा लागलाय नवा साज.. उमेश माझा जुनाच गडी पण नवं माझं राज्य.” हा व्हिडीओ शेअर करत “माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवस, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय, आमच्या लग्नातील सर्वांत चांगला क्षण. श्री कामत १० वर्षे पूर्ण झाली,” असे कॅप्शन प्रियाने दिले आहे.

आणखी वाचा : आर्यनची केस लढणारे सतीश मानेशिंदे एका दिवसासाठी घेतायत इतकी फी…

आणखी वाचा : आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या क्रूझवरील पार्टीचा व्हिडीओ आला समोर

प्रिया आणि उमेश यांनी सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न केले. उमेश अभिनय क्षेत्रात असल्याने प्रियाच्या कुटुंबाचा या लग्नाला सुरुवातीला विरोध होता. प्रिया आणि उमेशच्या वयाच जवळपास आठ वर्षांचा फरक आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priya bapat shares video with umesh kamat on celebrating 10 years of marriage dcp