बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर काही दिवसांपूर्वी सीतेच्या भूमिकेमुळे चर्चेत आली होती. या भूमिकेसाठी करीनाने १२ कोटी रुपयांची मागणी केली अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे आता करीनाच्या जागेवर दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरु असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या काळात मानधन हा सगळ्यात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. तापसी पन्नू आणि सोनम कपूर सारख्या अनेक अभिनेत्रींनी मुलाखतीत वगैरे यांनी देखील यावर बरीच चर्चा केली. आता करीनाला ‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्री प्रियामणीने पाठिंबा दिला आहे.
प्रियामणीने नुकतीच ‘बॉलिवूड बबल’ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने या विषयी चर्चा केली आहे. “मानधनातील फरकाबद्दल बोलायचं झालं तर एखादी स्त्री एवढी मागणी करत असेल तर ती त्यासाठी पात्र असते. याविषयी तुम्ही प्रश्न विचारायला नको असे मला वाटते. कारण अधिक मानधन मागण्यात काहीही चूक नाही,” असे प्रियामणी म्हणाली.
आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘ती बेडवर माझी वाट पाहत होती…’, महेश भट्ट यांनी परवीन बाबी विषयी केला होता खुलासा
पुढे प्रियामणी म्हणाली, “यशस्वी असलेल्या अभिनेत्रींने काही ठरावीक मानधनाची मागणी केली तर त्यात काही चूक नाही. बऱ्याचवेळा आम्ही अभिनेत्यांच्या मानधनाविषयी चर्चा करणारे लेख वाचतो. आता या महिला अशा टप्प्यावर पोहोचल्या आहेत की जिथे त्यांना काय पाहिजे हे त्या सांगू शकतात. फक्त तुम्हाला हे चुकीचं असल्याचं वाटतं याचा अर्थ असा नाही की ती महिला त्या भूमिकेसाठी पात्र नाही. यामुळे तुम्ही त्या महिलेवर कमेंट करू शकत नाही. ”