बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका चोप्रा सध्या विदेशात आहे. कधी कोणत्या सीरिजचं चित्रीकरण तर कधी कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणात प्रियांका व्यस्त असते. तरी देखील प्रियांका भारतीय सणांना कधीच विसरली नाही. प्रियांकाने महाशिवरात्री ही तिच्या लॉस एंजलिसमध्ये असलेल्या तिच्या घरात साजरी केली आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
हा फोटो प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केले आहेत. या फोटोत महादेवाची मुर्ती समोर प्रियांका आणि निक दिसत आहे. प्रियांकाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर पती निक जोनसने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. प्रियांका आणि निकच्या मुलीची ही पहिली महाशिवरात्री आहे. हा फोटो शेअर करत प्रियांकाने “सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! हर हर महादेव”, असे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “खरंच प्रार्थना पूर्ण होतायेत असं वाटतंय…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…
याआधी प्रियांकाचे दिवाळीतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी प्रियांकाने लॉस एंजलिसमध्ये असलेल्या तिच्या घरी लक्ष्मी पूजन केले होते. एवढचं काय तर तिने तिच्या मोलकरीणला सुद्धा या पूजेत सामिल केले होते. त्यामुळे तिचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते.
आणखी वाचा : “माझ्यावर खर्च करण्यापेक्षा…”, ‘झुंड’साठी अमिताभ यांनी केली मानधनात कपात
प्रियांका लवकरच फरहान अख्कर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील असणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांकाचा ‘मॅट्रिक्स ४’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर प्रियांका ‘टेक्ट फॉर यू’ आणि ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे.